Zakir Khan Health Update : आपल्या मिश्किल शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा लोकप्रिय स्टँड-अप कॉमेडियन झाकीर खान सध्या चर्चेत आहे. झाकीर खान सध्या मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल आहे. झाकीरचा धाकटा भाऊ अरबाज खान याने नुकत्याच शेअर केलेल्या एका रमझान व्हलॉगमध्ये (Vlog) झाकीर खानची झलक दिसल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अरबाज खानने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो झाकीरची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचल्याचे दिसत आहे. रुग्णालयातील ही रूम एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलसारखी दिसत असून, तिथे झाकीर टी-२० विश्वचषक फायनलचा सामना पाहताना दिसत आहे. यावेळी आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा आणि त्यांची पत्नी श्रद्धा देखील झाकीरची विचारपूस करण्यासाठी तिथे उपस्थित होते. 12th Fail हा चित्रपट मनोज कुमार शर्मा यांच्या आयुष्यावर आधारित आहे. झाकीर या सर्वांसोबत हसत-खळत गप्पा मारताना दिसत असल्याने चाहत्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.
झाकीर खानने अलीकडेच 'गल्फ न्यूज'शी बोलताना आपल्या प्रकृतीबाबत खुलासा केला होता. तो म्हणाला, "माझ्या कुटुंबात काही अनुवांशिक आजार आहेत, जे एका विशिष्ट वयानंतर उद्भवतात. गेल्या काही वर्षांत मी माझ्या शरीराला खूप त्रास दिला आहे, त्यामुळे आता मला विश्रांतीची गरज आहे". तसेच, गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित असलेले लिखाणाचे काम पूर्ण करण्यासाठी त्याने हा ब्रेक घेतल्याचे सांगितले.
सोशल मीडियावर झाकीरच्या प्रकृतीबाबत अनेक उलट-सुलट चर्चा सुरू होत्या. यावर प्रतिक्रिया देताना अरबाजने स्पष्ट केले की, "झाकीरची तब्येत थोडी खराब आहे, पण काळजी करण्यासारखे काही नाही. इंटरनेटवर तुम्ही ज्या अफवा वाचत आहात, त्या खोट्या आहेत". झाकीरच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी "ईदच्या आधी बरा हो" आणि "गेट वेल सून" अशा कमेंट्स करत त्याच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.
Web Summary : Comedian Zakir Khan is in Mumbai's Lilavati Hospital. His brother's vlog sparked concern. Zakir revealed family health issues require rest. He's also using this time to finish writing projects, reassuring fans he's doing okay despite health concerns.
Web Summary : कॉमेडियन ज़किर खान मुंबई के लीलावती अस्पताल में हैं। उनके भाई के व्लॉग से चिंता बढ़ी। ज़किर ने बताया कि परिवार में स्वास्थ्य संबंधी समस्याएँ हैं, इसलिए आराम की ज़रूरत है। वह इस समय का उपयोग लेखन परियोजनाओं को पूरा करने के लिए भी कर रहे हैं, और प्रशंसकों को आश्वस्त कर रहे हैं कि वह ठीक हैं।