Join us
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या ट्रोलिंगला कंटाळून मायरा वायकुळच्या पालकांनी घेतला 'हा' मोठा निर्णय, असं काय घडलेलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 18:10 IST

मायरा वायकुळ हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय असणाऱ्या बालकलाकारांपैकी एक नाव आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून मायरा वायकुळ घराघरात पोहोचली.

Mayra Waikul: मायरा वायकुळ हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय असणाऱ्या बालकलाकारांपैकी एक नाव आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून मायरा वायकुळ घराघरात पोहोचली.या मालिकेत  तिने साकारलेली परी अजूनही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. या मालिकेतनंतर मायराला चांगलीच लोकप्रियता मिळाली. शिवाय मायरा वेगवेगळ्या मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकली.सध्या ही बालकलाकार एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अशातच आता मायराबद्दल तिच्या आई-वडिलांनी मोठा निर्णय घेतला आहे.

मायरा वायकुळचा चाहतावर्ग कमालीचा मोठा आहे. मायरा सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते. त्यामाध्यमातून ती आपले क्यूट फोटोज, व्हिडीओज चाहत्यांसोबत शेअर करते. चाहत्यांची लाडकी असणार्‍या मायराच्या बाबतीत तिच्या पालकांनी एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे.  मायराचं इन्स्टाग्राम अकाउंट बंद करण्यात आलं असल्याची माहिती मिळते आहे. यामागचं कारण, अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या निर्णयामुळे मायराचे चाहते संभ्रमात पडले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही काळापासून मायराच्या फोटो, व्हिडीओंवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत होत्या. काही जण तिच्या निरागस अभिनयाचं कौतुक करत होते, शिवाय तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. या नकारात्मकतेचा परिणाम मुलांच्या मनावर होऊ नये, म्हणूनच पालकांनी हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, याबाबत मायराच्या पालकांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tired of trolling, Myra Waikul's parents made 'this' big decision.

Web Summary : Child actress Myra Waikul's parents deactivated her Instagram due to negative comments and trolling. They feared it would negatively affect her. The decision has confused fans.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी