Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘काळभैरव रहस्य-2’मध्ये लोकप्रिय अभिनेत्री सोनिया सिंहचा प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 11:27 IST

'दिल मिल गए’ या मालिकेतील डॉ. कीर्तीच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री सोनिया सिंह ही ‘स्टार भारत’वरील ‘काळभैरव रहस्य’ या मालिकेच्या दुसऱ्या सिझनमध्ये भूमिका साकारणार आहे

'दिल मिल गए’ या मालिकेतील डॉ. कीर्तीच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री सोनिया सिंह ही ‘स्टार भारत’वरील ‘काळभैरव रहस्य’ या मालिकेच्या दुसऱ्या सिझनमध्ये भूमिका साकारणार आहे. सोनिया सिंह ही खलनायिकेच्या भूमिकांसाठी प्रसिध्द असून ‘काळभैरव रहस्य-2’ या मालिकेतही तिच्या अभिनयाचा कस लागणार आहे. या मालिकेत ती गावातील काही राण्यांपैकी राणी रेवतीची भूमिका साकारणार आहे. तिच्या या भूमिकेत नकारात्मक छटा असतील आणि ही व्यक्तिरेखा तिच्या कारकीर्दीतील एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा ठरेल, यात शंका नाही.

या मालिकेतील आपली भूमिका आणि आतापर्यंतच्या चित्रीकरणाच्या अनुभवासंबंधी सोनिया सिंह म्हणाली, “या मालिकेच्या मनाची पकड घेणाऱ्या कथानकामुळे मी ही भूमिका रंगविण्यास खूपच उत्सुक बनले आहे. शिवाय माझ्या व्यक्तिरेखेची वेशभूषा आणि एकंदर रूप हेही मला फार आवडलं आहे. मी या मालिकेच्या प्रसारणाची वाट बघते आहे.”

‘काळभैरव रहस्य’ ही एक सामाजिक थरार मालिका असून मूळ मालिकेचे बहुतांशी चित्रीकरण भोपाळमध्ये पार पडले होते. त्यात छवी पांडे, राहुल शर्मा आणि सरगुन कौर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आता या मालिकेच्या दुसऱ्या आवृत्तीचे चित्रीकरण सुरू असून तिचे कथानक पूर्वीच्या कथानकापेक्षा वेगळे असेल. या दुसऱ्या आवृत्तीचे चित्रीकरणही भोपाळमध्येच करण्याची सारी तयारी झाली होती. पण नेमका त्याच वेळी गौतम रोडे हा कलाकार आजारी पडला आणि तो चित्रीकरणासाठी येऊ शकत नसल्याने चित्रीकरण रद्द करावे लागले.