प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात अनेक सेलिब्रिटी जातात. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रेमानंद महाराजांपुढे सेलिब्रिटी नतमस्तक होतात. अगदी क्रिकेटर्सपासून ते बॉलिवूड कलाकार आणि बिजनेसमॅनही प्रेमानंद महाराजांची भेट घेतात. पण, आता अशी एक व्यक्ती महाराजांच्या आश्रमात पोहोचली आहे. जिला पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बोल्ड कंटेटसाठी प्रसिद्ध असलेली लोकप्रिय मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे प्रेमानंद महाराजांच्या दर्शनाला गेली होती. तिला प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
कायम चर्चेत असणारी आणि वादात अडकलेली पूनम पांडे प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात पोहोचली. पूनम पांडेचे प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातले काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये ती महाराजांच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं दिसत आहे. प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात गेल्यानंतर तिला अश्रू अनावर झाल्याचंही व्हिडीओत पाहायला मिळत आहे. पूनम पांडेचं हे रूप पाहून चाहत्यांनाही आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे.
पूनम पांडेचे फोटो आणि व्हिडीओ विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आले आहेत. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी पूनम पांडे भक्तीमार्गाला लागलेलं पाहून आनंद झाला आहे. तर काहींनी तिला ट्रोलही केलं आहे.
"ही तीच आहे ना जी मरुन पुन्हा जिवंत झाली होती?", "एका वेळेनंतर फक्त देवाच्या दारातच शांती मिळते", "इथे आली आहेस तर सुधर आता", "चांगलं जीवन जगण्याची सुरुवात केली आहेस तर आता काहीही चुकीचं करू नकोस", "सगळ्यांना बिघडवून आता स्वत: सुधारत आहे", अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
Web Summary : Poonam Pandey, known for bold content, visited Premanand Maharaj's ashram, surprising many. Photos and videos show her devotion, with some fans expressing shock and others hoping she has turned over a new leaf.
Web Summary : बोल्ड कंटेंट के लिए मशहूर पूनम पांडे प्रेमानंद महाराज के आश्रम पहुंची, जिससे कई लोग हैरान हैं। तस्वीरें और वीडियो उसकी भक्ति दिखाते हैं, कुछ प्रशंसक सदमे में हैं और कुछ को उम्मीद है कि उसने एक नया जीवन शुरू किया है।