Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूजा वर्मा करणार ‘नामकरण’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 11:57 IST

‘वो रहनेवालीं महलों की’ मालिकेतील अभिनेत्री पूजा वर्माला आणखी एका मालिकेची लॉटरी लागलीय. महेश भट्ट यांच्या बायोपिक मालिका असलेल्या ‘नामकरण’मध्ये पूजाची ...

वो रहनेवालीं महलों की मालिकेतील अभिनेत्री पूजा वर्माला आणखी एका मालिकेची लॉटरी लागलीय. महेश भट्ट यांच्या बायोपिक मालिका असलेल्या नामकरणमध्ये पूजाची वर्णी लागलीय.गुरुदेव भल्ला आणि धवल गाडा यांनी या मालिकेची निर्मिती केलीय.अभिनेता पुरु छिब्बर हा पूजाचा नायक असणार आहे. पूजानं पंजाबी सिनेमात काम केलं असून बाज, मोगा टू मेलबर्न या सिनेमातही तिनं अभिनयाची जादू दाखवलीय. सप्टेंबर महिन्यात दिया और बाती हम या मालिकेनं निरोप घेतल्यानंतर त्याची जागा नामकरण ही मालिका घेणार आहे. पूजा आणि पुरुशिवाय विराफ पटेल आणि बरखा बिष्ट यांच्याही या मालिकेत प्रमुख भूमिका आहेत.