Join us
Daily Top 2Weekly Top 5

​उपासना सिंगने द कपिल शर्मा शोला ठोकला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 16:46 IST

द कपिल शर्मा शोचे वाईट दिवस सुरू आहेत असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. या कार्यक्रमाचा टिआरपी आता ...

द कपिल शर्मा शोचे वाईट दिवस सुरू आहेत असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. या कार्यक्रमाचा टिआरपी आता दिवसेंदिवस ढासळू लागला आहे. कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यात विमानात झालेल्या भांडणांनंतर सुनीलने या कार्यक्रमाला रामराम ठोकला होता. त्याच्यासोबतच अली असगरने देखील हा कार्यक्रम सोडला. अली आणि सुनीलने कार्यक्रम सोडल्यावर कपिलला चांगलाच धक्का बसला होता. या दोघांनी कार्यक्रम सोडल्यावर कपिलच्या कार्यक्रमाची लोकप्रियता देखील दिवसेंदिवस कमी होत गेली. त्यामुळे कपिलने सुमोना चक्रवर्ती आणि उपासना सिंग यांना त्याच्या टीममध्ये परत बोलावले. खरे तर सुमोना आणि उपासना द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाचा सुरुवातीपासूनच भाग होते. पण दरम्यानच्या काळात ते खूपच कमी वेळा कार्यक्रमात पाहायला मिळाले होते. पण त्यांच्या कमबॅकने टिआरपीवर परिणाम होईल अशी कपिलला आशा होती.सुमोना आणि उपासना कार्यक्रमाचा पुन्हा भाग झाल्यानंतरही त्याचा थोडादेखील टिआरपीवर परिणाम झाला नाही. सध्या तर अनेकवेळा या कार्यक्रमाचे चित्रीकरण देखील रद्द झाल्याचे ऐकायला मिळत आहे. आता या कार्यक्रमाच्या टीमला आणखी एक धक्का बसला आहे. उपासना सिंगने आता हा कार्यक्रम सोडला असून ती कपिलचा प्रतिस्पर्धी कृष्णा अभिषेकच्या कार्यक्रमात झळकणार आहे. ती द ड्रामा कंपनी या कार्यक्रमाचा भाग होणार असून तिनेच सुदेश लहरीसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामला पोस्ट करत याबाबतची बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे. पोस्टर बॉईज या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सनी देओल, बॉबी देओल, श्रेयस तळपदे द ड्रामा कंपनी या कार्यक्रमात येणार असून उपासना सिंगसोबत ते धमाल मस्ती करणार आहेत. Also Read : SHOCKING !! वारंवार का आजारी पडतोयं कपिल शर्मा? हे तर नाही खरे कारण??