Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूजा गौर सांगतेय, मी बिग बॉसचा कधी विचारच केला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 12:18 IST

पूजा गौरने मन की आवाज प्रतिज्ञा, कितनी मोहोब्बत है, सपना बाबुल का... बिदाई, मायके से बंधी डोर, ये रिश्ता ...

पूजा गौरने मन की आवाज प्रतिज्ञा, कितनी मोहोब्बत है, सपना बाबुल का... बिदाई, मायके से बंधी डोर, ये रिश्ता क्या कहलाता है यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते. या मालिकेतील प्रतिज्ञा या भूमिकेमुळे ती चांगलीच नावारूपाला आली होती. या मालिकेनंतर सध्या ती सावधान इंडिया या कार्यक्रमाच्या काही भागांचे सूत्रसंचालन करत आहे. सध्याच्या छोट्या पडद्याविषयी तिने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. ती या मुलाखतीत ती सांगते, " सध्याचा छोटा पडदा खूपच बदलला आहे. गेल्या काही वर्षांत छोट्या पडद्यावर खूप चांगल्या कथा पाहायला मिळत आहेत. प्रत्येक वाहिनी दुसऱ्या वाहिनीपेक्षा चांगल्या मालिका घेऊन येण्यासाठी नवनवीन प्रयोग घेऊन येत आहे. पण तरीही सासू सूनेच्या गोष्टी हा छोट्या पडद्यावरचा एक भाग नेहमीच राहाणार आहे. छोट्या पडद्यावर सासू-सूनेच्या कथा नसणे हे अशक्य आहे. कारण सासू-सूनेचे नाते हे आपल्या समाजात खूप महत्त्वाचे नाते मानले जाते." पूजाने आतापर्यंत कोणत्याच रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतलेला नाही. पण पुढील काळात रिअॅलिटी शो करण्याचा तिचा विचार आहे. याविषयी ती सांगते, "डान्स रिअॅलिटी शो करायला मला आवडेल. पण बिग बॉसचा मी कधी विचारच केलेला नाहीये. तुम्ही घरात असताना कॅमेरा सतत तुमच्यासमोर असणार या गोष्टीचा मी विचारदेखील करू शकत नाही. मी मी फोन आणि मनोरंजनाच्या साधनांशिवाय राहूच शकत नसल्याने मी बिग बॉस या कार्यक्रमाचा भाग व्हायचे कधी ठरवलेच नाही. बिग बॉस या कार्यक्रमाविषयी अनेक सेलिब्रेटींना आकर्षण असते. पण मी कधी या कार्यक्रमाचा विचारच केलेला नाही."