Join us

खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 17:53 IST

सगळं हळू हळू कळेल...पूजाने दिली लग्नाची हिंट

अभिनेत्री पूजा बिरारी हे नवा सध्या चर्चेत आहे. कारण पूजा लवकरच बांदेकरांची सून होणार आहे. आदेश बांदेकरांचा मुलगा सोहम बांदेकरशी ती लग्नगाठ बांधणार आहे. पूजा सध्या स्टार प्रवाहवरील 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत मंजिरीची भूमिका साकारत आहे. मंजिरी आणि रायाची लव्हस्टोरी मालिकेत दाखवण्यात आली आहे. दरम्यान खऱ्या आयुष्यातल्या रायावर म्हणजेच सोहमबाबतीत पूजाने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत पूजा बिरारीला लग्नाच्या चर्चांवर प्रश्न विचारण्यात आला. बातमी जेव्हा बाहेर आली तेव्हा तुझी रिअॅक्शन काय होती असं विचारण्यात आलं. तसंच ऑनस्क्रीन राया इतका तापट आहे तर खऱ्या आयुष्यातला जोडीदार तितकाच शांत आहे यावर तुला काय म्हणायचं आहे असाही प्रश्न विचारला. यावर पूजा आधी लाजली आणि मग म्हणाली, "मला यावर इतक्यात तरी काही बोलायचं नाही. ही बातमी जेव्हा आली तेव्हा मी सेटवर झोपले होते. खूप व्यग्र शेड्युल असल्याने मध्ये वेळ मिळाला होता म्हणून मला झोप लागली होती. उठल्यावर बघितलं तर मला भरमसाठ मिस्ड कॉल्स होते. याहून जास्त मी काही बोलू शकत नाही. जे काही आहे ते हळू हळू कळेल."

पूजा बिरारीने अप्रत्यक्षरित्या सोहमसोबत लग्नाची बातमी कन्फर्म केली आहे. याआधी आदेश बांदेकर यांनीही लेकाच्या लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब केलं होतं. पुढील वर्षी गणेशोत्सवाला सूनेला घेऊन येणार असं ते म्हणाले होते. तसंच बांदेकरांच्या घरी गणपतीच्या आरतीला पूजाही दिसली होती. त्यामुळे सध्या पूजा आणि सोहमच्या लग्नाच्या चर्चा जोर धरुन आहेत. हे कपल डिसेंबरमध्ये लग्न करणार अशीही चर्चा आहे. दोघांचे चाहते यासाछी उत्सुक आहेत.

कोण आहे पूजा बिरारी?

पूजा मूळची पुण्याची आहे. ती पहिल्यांदा 'साजणा' या मराठी मालिकेत दिसली होती. झी युवा वाहिनीवर ही मालिका प्रसारित झाली होती. यानंतर ती 'स्वाभिमान: शोध अस्तित्वाचा' या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचली. यात तिची पल्लवी ही भूमिका होती. तर आता 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेतून पूजा प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. 

टॅग्स :मराठी अभिनेतालग्नआदेश बांदेकरटिव्ही कलाकार