Television Actress: सीआयडी ही टीव्हीजगतातील सर्वाधिक गाजलेली आणि भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त बघितली जाणारी मालिका आहे.या मालिकेतील एसीपी प्रद्युम्न, दया आणि अभिजीत ही पात्रे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. यामध्ये अभिनेत्री जसवीर कौरने इन्स्पेक्टर काजल नावाचं पात्र साकारलं होतं. तिच्या या भूमिकेचं फार कौतुक झालं. सध्या जसवीरच्या एका मुलाखतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या मुलाखतीत तिने 'सीआयडी' मालिका तसेच तिच्या आयुष्यात घडलेल्या धक्कादायक प्रसंगाविषयी सांगितलं आहे.
अभिनेत्री जसवीर कौरने 'सीआयडी', 'अनुपमा' तसेच 'तारक मेहता का उल्टा चश्मा' यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. परंतु नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जसवीर तिच्या आयुष्यातील काही अशा घडामोडींविषयी व्यक्त झाली, जे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.शुभोजित घोष यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना जसवीरने सांगितलं की एकदा कोणीतरी तिचे केस जमिनीत गाडून काळी जादू केल्याचा प्रकार घडला होता.ती घटना आजही आठवली तर अंगावर काटा येतो. याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, “माझे केस कापून जमिनीत पुरलं होतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी माझे केस विंचरत होती, तेव्हा माझे केस कापले असल्याचं जाणवलं. हा काही छोटा भाग नव्हता. केसांची एक मोठी बटच कापलेली दिसत होती."
मग अभिनेत्री म्हणाली,"त्यानंतर माझ्या भावाला एका महिलेनं सांगितलं की तुझ्या बहिणीचे केस कापून जमिनीत पुरले आहेत. त्याला याविषयी काहीच माहित नव्हतं, तरी त्या महिलेनं अचानक त्याला असं सांगितलं. ही काळी जादू होती. या घटनेनंतर मला आजही खूप भीती वाटते.” मात्र, हे सगळं कोणी केलं होतं याचा अद्याप उलगडा झालेला नाही असं अभिनेत्रीने सांगितलं.
सीआयडी मालिकेबद्दल अभिनेत्री म्हणाली, "जवळजवळ दोन वर्षे उलटून गेली होती. दर शुक्रवारी, दर शनिवारी आम्ही नॉनस्टॉप शूटिंग करायचो. त्यावेळेस रोज आम्ही सलग ३१ दिवस शूटिंग करत होतो. क्वचितच मी म्हणायचे की, प्लीज मला एक दिवसाची सुट्टी द्या. अचानक मला ऑफिसमधून सांगण्यात आलं की, मला हा शो सोडावा लागेल. कधी कधी टीम माझ्या शेड्यूलनुसार काम करत होती. दरम्यान, सेटवर देखील काही बदलाव व्हायचे. हा काळ गोंधळात टाकणारा होता', असा खुलासा अभिनेत्रीने केला.
Web Summary : CID actress Jasveer Kaur recounted a chilling experience where her hair was cut and buried, suspecting black magic. She also spoke about her sudden exit from CID after continuous shooting schedules and unexpected office decisions, leaving her confused.
Web Summary : सीआईडी अभिनेत्री जसवीर कौर ने एक भयावह अनुभव साझा किया, जिसमें उनके बाल काटकर दफना दिए गए, जिससे उन्हें काले जादू का संदेह हुआ। उन्होंने लगातार शूटिंग शेड्यूल और अप्रत्याशित कार्यालय निर्णयों के बाद सीआईडी से अचानक बाहर निकलने के बारे में भी बात की, जिससे वह भ्रमित हो गईं।