Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘जीत गई तो पिया मोरे’ची ‘देवी’ पोहोचली लोकमत कार्यालयात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 13:06 IST

‘जीत गई तो पिया मोरे’ या मालिकेचे १०० एपिसोड अलीकडेच पूर्ण झालेत. हे यश सेलिब्रिट करण्यासाठी मालिकेची लीड अ‍ॅक्ट्रेस ...

‘जीत गई तो पिया मोरे’ या मालिकेचे १०० एपिसोड अलीकडेच पूर्ण झालेत. हे यश सेलिब्रिट करण्यासाठी मालिकेची लीड अ‍ॅक्ट्रेस येशा रुघानी काल गुरुवारी नागपूर लोकमतच्या कार्यालयात पोहोचली. यावेळी ‘लोकमत सीएनएक्स मस्ती’च्या टीमशी तिने दिलखुलास गप्पा मारल्या. माझ्या मालिकेला आणि विशेषत: मी साकारत असलेल्या देवी चौहान या भूमिकेला लोकांचे प्रचंड प्रेम मिळतेय. हे प्रेम माझ्यासारख्या नवख्या अभिनेत्रीसाठी अद्भूत आहे. या प्रेमाने मी भारावून गेले आहे. प्रेक्षकांचे आभार मानण्यासाठीचं मी येथे आले आहे, असे येशा म्हणाली. मी स्वप्नातही अभिनेत्री बनण्याचा विचार केला नव्हता. भरदुपारी ध्यानीमनी नसताना ही संधी माझ्यापुढे चालून आली आणि मी अभिनेत्री बनले. पण आताश: मी मनोरंजनाच्या या दुनियेत चांगलीच रमलीय. माझ्या मालिकेने १०० एपिसोड पूर्ण केलेत, याचा आनंद आहेच. यानिमित्ताने प्रेक्षकांची मने जिंकू शकले याचाही आनंद आहे. भविष्यातही प्रामाणिकपणे काम करण्याचा आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचाच माझा प्रयत्न असेल, असेही येशा म्हणाली.टीव्ही इंडस्ट्रीत रोज नवे चेहरे येत आहेत. यातील अनेक चेहरे गर्दीत हरवून जातात. तुलाही या गर्दीत हरवून जाण्याची भीती वाटते का? असे विचारले असता, अजिबात नाही, असे येशा म्हणाली. मला गर्दीत हरवून जाण्याची अजिबात भीती नाही. कारण मी अनेकांच्या गर्दीतून निवडली गेलीय. जी गर्दीतून निवडली गेली असेल तिला गर्दीत हरवण्याची भीती कशी असू शकते, असे येशा म्हणाली. या शोमध्ये कृप कपूर मुख्य भूमिकेत आहे. येशाने तिच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.