Join us
Daily Top 2Weekly Top 5

'पिंजरा खुबसूरती का'ने गाठला २०० एपिसोड्सचा टप्‍पा,दणक्यात झाले सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 11:16 IST

मालिका 'पिंजरा खुबसूरती का'ने हा टप्‍पा गाठला आहे. ही मालिका सर्वोत्तम असण्‍यासोबत अधिकाधिक प्रबळ होत आहे.

कलर्सवरील मालिका 'पिंजरा खुबसूरती का' मयुराच्‍या (रिया शर्माने साकारलेली भूमिका) जीवनप्रवासाला दाखवते. बाहेरील सौंदर्याकडे आकर्षिलेल्‍या ओमकारला (साहिल उप्‍पलने साकारलेली भूमिका) भेटल्‍यानंतर तिचे जीवनच बदलून जाते. ती कशाप्रकारे या स्थितींचा सामना करते आणि सौंदर्याप्रती आकर्षिलेल्‍या पतीला देखील कशाप्रकारे बदलते हे या मालिकेमध्‍ये पाहायला मिळते.

 

मनोरंजनपूर्ण व नाट्यमय ट्विस्‍ट्सनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच मालिकेने २०० एपिसोड्स पूर्ण करण्‍याचा टप्‍पा गाठला आहे. प्रेक्षकांना अधिक ड्रामा पाहायला मिळणार आहे. मयुराचा एसीपी राघव शास्‍त्रीशी (करण वोहराने साकारलेली भूमिका) आमनासामना होतो, जो तिच्‍यावर प्रेम करतो.

या खासप्रसंगाबाबत बोलताना ओमकारची भूमिका साकारणारा साहिल म्‍हणाला, ''मला आनंद होत आहे की, मालिका 'पिंजरा खुबसूरती का'ने हा टप्‍पा गाठला आहे. ही मालिका सर्वोत्तम असण्‍यासोबत अधिकाधिक प्रबळ होत आहे. मी या मालिकेचा भाग असल्‍यामुळे स्‍वत:ला भाग्‍यवान समजतो. ओमकार ही भूमिका अत्‍यंत जटिल आहे आणि त्‍याचा सौंदर्याकडे पाहण्‍याचा दृष्टिकोन वेगळा आहे. निर्मात्‍यांनी नेहमीच काहीतरी नवीन व रोमांचक घडण्‍याची खात्री घेतली आहे आणि यामुळेच आम्‍ही हा सुवर्ण टप्‍पा गाठला आहे. मी अथक मेहनत घेत राहीन आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहीन.''  

२०० एपिसोड्सचा टप्‍पा गाठण्‍याबाबत बोलताना मयुराची भूमिका साकारणारी रिया शर्मा म्‍हणाली, ''२०० एपिसोड्सचा टप्‍पा गाठणे हे प्रभावी यश आहे आणि आम्‍ही हा टप्‍पा गाठल्‍याचा मला खूप आनंद होत आहे. मालिका व माझी भूमिका मयुराला प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम व प्रशंसेने माझ्या मनात खास स्‍थान निर्माण केले आहे. असे असले तरी मला वाटते की, ही फक्‍त सुरूवात आहे. मयुरा व ओमकारच्‍या जीवनामध्‍ये अनेक आव्‍हाने येणार आहेत.''