Join us

वल्लरीच्या संसारात सुमन टाकणार मिठाचा खडा, मैत्रिणी शिकवणार चांगलाच धडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 17:08 IST

Pinga Ga Pori Pinga Serial: 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत वल्लरीच्या आयुष्यातील संकटं संपायचं नावंच घेत नाही. अशात तिला साथ देत आहेत तिच्या मैत्रिणी म्हणजेच पिंगा गर्ल्स.

कलर्स मराठीवरील पिंगा गं पोरी पिंगा मालिकेत (Pinga Ga Pori Pinga Serial) वल्लरीच्या आयुष्यातील संकटं संपायचं नावंच घेत नाही. अशात तिला साथ देत आहेत तिच्या मैत्रिणी म्हणजेच पिंगा गर्ल्स. मनोजला आपलेसे करण्यासाठी सुमन अनेक प्रयत्न करते आहे. पण, मनोजचं मात्र वल्लरीवर जीवापाड प्रेम आहे. 

एकीकडे सुमन कशी मनोजसाठी योग्य आहे हे मनोजची आई त्याला समजावण्याचा प्रयत्न करत आहे आणि दुसरीकडे मनोज मात्र आपल्या मतावर ठाम आहे. त्याला सुमन बरोबर कोणतंही नातं जपण्यात रस नाहीये. पण, इंदू सुमनचं मन बदलण्यात यशस्वी होते. मनोजसमोर त्याच्या आईचे सत्य येते आणि तो आईला वल्लरीची माफी मागायला सांगते. मनोज आणि सुमन मुंबईला पिंगा गर्ल्सच्या घरी येतात. सुमन आणि मनोजला असं एकत्र आलेलं बघून पिंगा गर्ल्स जरा शॉकच होतात. त्यात सगळ्यांची सुमन कुठे राहणार यावरून चर्चा सुरु होते. 

पिंगा गर्ल्स सुमनला शिकवणार धडा

सुमन अनेक छोटया मोठ्या गोष्टी करत असताना मालिकेत दिसून येत आहे.जसं मनोजचा उष्टा चहा पिणे, वल्लरीच्या हातावर गरम वरण सांडवणे हे बघून पिंगा गर्ल्सना राग येतो. सुमनचा डाव नक्की काय आहे हे पिंगा गर्ल्सना कळले आहे. वल्लरीच्या संसारात सुमन मिठाचा खडा टाकत आहे हे पिंगा गर्ल्सना कळून चुकले आहे. प्रत्येक क्षणी सुमन वल्लरी आणि मनोजच्या मध्ये येते आहे हे बघून पिंगा गर्ल्स सुमनला धडा शिकवायचं ठरवतात. आता नक्की त्या काय करणार ? कसा सुमनला धडा शिकवणार ? हे बघणे उत्सुकेतचे असणार आहे.