Join us
Daily Top 2Weekly Top 5

'फुलपाखरू' मालिकेच ६०० भाग पूर्ण, कलाकारांनी सेटवर असे केले सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 08:00 IST

हृता आणि यशोमन या जोडीचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. त्यामुळे मालिकेला नेहमीच छान प्रतिसाद मिळत आहे.

हृता दुर्गुळे आणि यशोमन आपटे यांच्या मुख्य भूमिका असलेली 'फुलपाखरू' या मालिकेने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली. मालिकेतील सारेच पात्र रसिकांच्या पसंतीस पात्र ठरले. विशेष म्हणजे मानस आणि वैदेहीचं कॉलेज जीवनातील प्रेम, पुढे त्यांचं झालेलं लग्न आणि त्यांची मुलगी माही, अशा सगळ्यांवरच प्रेक्षकांनी खूप प्रेम केले. या प्रेमाच्या जोरावरच आज 'फुलपाखरू' या मालिकेचे ६०० भाग पूर्ण  झाले आहेत. मालिकेच्या संपूर्ण टीमने, सेटवर केक कापून जोरदार सेलिब्रेशन केले. 

हृता आणि यशोमन या जोडीचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. त्यामुळे मालिकेला नेहमीच छान प्रतिसाद मिळत आहे. एक आगळीवेगळी प्रेमकहाणी असणाऱ्या या मालिकेने यशाचे हे नवेशिखर गाठले आहे. हे यश साजरे करताना, संपूर्ण टीमच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता. पडद्यावर दिसणाऱ्या सर्व कलाकारांनी, पडद्यामागे मेहनत घेणाऱ्या सर्व टीमचे मनापासून आभार मानले. यापुढेही मालिका प्रेक्षकांना असाच आनंद देत राहील याची असा विश्वास यावेळी टीमने व्यक्त केला. 

हृता दुर्गुळेने सांगितले की, "मालिकेचे ६०० भाग पूर्ण होणं, ही आमच्या सगळ्यांसाठीच एक आनंदाची बाब आहे. पण, आमच्यावर प्रेम करणाऱ्या प्रेक्षक वर्गाशिवाय ही गोष्ट शक्य नव्हती. म्हणूनच मी चाहत्यांचे मनापासून आभार मानते. अनेक नवनवीन मालिका सतत येत असतात. प्रेक्षकांनी दाखवेलले प्रेम, विश्वास तसाच राहावा यासाठी उत्तम काम करत राहणं हे खरंच कठीण असतं. ते आम्ही करू शकलो म्हणून आज हे यश पाहायला मिळते आहे. त्याचा नक्कीच खूप आनंद वाटतो आहे. 

टॅग्स :फुलपाखरूऋता दूर्गुळे