Join us

'फुलाला सुगंध मातीचा'मधील जिजी आक्कांचा खऱ्या आयुष्यातील नवरा देखील आहे अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 07:00 IST

Aditi Deshpande : 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतील शुभम आणि कीर्तीच्या भूमिकेइतकीच जिजी आक्कांची भूमिका देखील प्रचंड गाजली. ही भूमिका अदिती देशपांडे यांनी साकारली आहे.

स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा (Phulala Sugandh Maticha) या मालिकेला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. मालिकेतील शुभम आणि कीर्तीच्या भूमिकेईतकीच जिजी आक्कांची भूमिका देखील प्रचंड गाजली. ही भूमिका अदिती मूलगुंड देशपांडे यांनी साकारली आहे. फार कमी लोकांना माहित आहे की, अदिती देशपांडे (Aditi Deshpande) यांचा नवरादेखील प्रसिद्ध अभिनेते आहेत आणि त्यांच्या सासूबाई देखील मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. 

अदिती देशपांडे या हिंदी आणि मराठी चित्रपट तसेच मालिका अभिनेत्री आहेत. पेहरेदार पिया की या हिंदी मालिकेत त्यांनी महत्वाची भूमिका केली होती. नॉट ओन्ली मिसेस राऊत, जोगवा, दशक्रिया या त्यांनी अभिनित केलेल्या चित्रपटांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अदिती देशपांडे या दिवंगत अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या सून आहेत.

सुलभाताई देशपांडे या पूर्वाश्रमीच्या सुलभा कामेरकर. छबिलदास शाळेत त्यांनी आपले शिक्षण घेतले. त्याच शाळेत त्यांनी शिक्षिकेची नोकरी स्वीकारली होती. आज सुलभा देशपांडे आपल्यात नसल्या तरी ११५ मराठी आणि २११ हुन अधिक हिंदी मालिका गाजवून त्या आपल्या स्मरणात कायम राहिल्या आहेत.

सुलभा देशपांडे आणि अरविंद देशपांडे यांचा मुलगा निनाद देशपांडे हे देखील बालपणापासूनच अभिनय सृष्टीत कार्यरत आहेत. आई कुठे काय करते या मालिकेत निनाद देशपांडे यांनी अनघाच्या वडिलांची म्हणजेच प्रदीप दादांची भूमिका साकारली आहे. अभिनेते यतीन कार्येकर आणि निनाद देशपांडे हे दोघे सख्खे मावसभाऊ आहेत हे खूप कमी जणांना माहीत आहे. सुलभा देशपांडे यांचे संपूर्ण कुटुंबच कला क्षेत्राशी निगडित आहे. त्यांची थोरली बहिण ज्योत्स्ना कार्येकर या देखील हिंदी मराठी चित्रपट अभिनेत्री आहेत. यतीन कार्येकर हा त्यांचाच मुलगा आहे. 

टॅग्स :स्टार प्रवाह