Join us
Daily Top 2Weekly Top 5

पर्लला झाली दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2016 17:18 IST

नागार्जुन-एक योद्धा या मालिकेत नागार्जुनची भूमिका अंशुमान मल्होत्रा साकारत होता. पण तो भूमिका चांगल्याप्रकारे साकारत नाही असे प्रोडक्शन टीमचे ...

नागार्जुन-एक योद्धा या मालिकेत नागार्जुनची भूमिका अंशुमान मल्होत्रा साकारत होता. पण तो भूमिका चांगल्याप्रकारे साकारत नाही असे प्रोडक्शन टीमचे म्हणणे असल्याने सध्या त्याची जागा पर्ल पुरीने घेतली आहे. पर्ल या मालिकेचा भाग बनून काहीच दिवस झालेले असताना चित्रीकरणाच्या दरम्यान त्याला एक दुखापत झाली आहे. त्याला एका दृश्यात झाडावर चढताना दाखवायचे होते. पर्लला काहीही केल्या झाडावर चढायला जमत नसल्याने अनेक रिटेक घ्यावे लागले. पण झाडावर चढल्यावर तिथून तो जोरदार आपटला आणि त्याच्या हाताला दुखापत झाली. याविषयी पर्ल सांगतो, "मी लहान असताना लपाछपी खेळण्यासाठी झाडावर चढत असे. त्यामुळे झाडावर चढणे हे अतिशय सोपे असल्याचे मला वाटत होते. पण आता 15 वर्षांनंतर झाडावर चढणे माझ्यासाठी खूप कठीण झाले होते. झाडावर चढल्यानंतर माझा हात सटकला आणि मी जोरात पडलो. माझ्या हाताला खूपच लागले. बर्फाने शेक दिल्यानंतर मला बरे वाटले आणि आम्ही पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात केली."