Join us

‘भाभीजी घर पर है’मध्ये ‘परफेक्ट जोडी’ नृत्य स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 15:29 IST

‘भाभीजी घर पर है’ ही मालिका विनोदी कथानकातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते.आगामी भागात या शोमधील कलाकार `डान्स का तडका` ...

‘भाभीजी घर पर है’ ही मालिका विनोदी कथानकातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते.आगामी भागात या शोमधील कलाकार `डान्स का तडका` लावून रसिकांचे अधिक मनोरंजन करताना दिसणार आहेत.प्रेक्षक आपल्या आवडत्या जोडीला परफेक्ट जोडीचा किताब पटकावण्यासाठी लढताना पाहणार आहेत.सूत्रांच्या माहितीनुसार,मॉडर्न कॉलनीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या नृत्य स्पर्धेत सहभागी होण्याकरिता मिनल अनिता भाभीला आग्रह करते.या स्पर्धेतील विजेत्याला ५ लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. हे ऐकल्यानंतर अनिता या स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेते.दुर्दैवाने, नृत्य स्पर्धेच्या सरावादरम्यान विभूतीच्या पाठीला दुखापत होते आणि ती उपचारासाठी अंगुरीला बोलावते.तिवारी या परिस्थितीचा फायदा घेतात.अंगुरीने तुला मदत करायला हवी असेल तर अनिताशी वाईट वाग,असं ते विभुतीला सांगतात.अनितासोबत विभूतीचे गैरवर्तन मिनलच्या लक्षात येतात आणि ती त्यांना अपात्र ठरवते.या संपूर्ण परिस्थितीत अनिता निराश होते,परंतु नंतर लवकरच विभूती एक नवी योजना घेऊन परत येतो.ते तशाचप्रकारची नृत्य स्पर्धा आयोजित करतात ज्यात अंगुरी आणि विभूती दोघेही सहभाग घेण्याचा निर्णय घेतात.या वेगळ्या ट्रॅकबाबत बोलताना सौम्या टंडन आका अनिता भाभी म्हणाली, “नृत्य स्पर्धेसाठी मी किशोर-आशा यांचे ‘एक मैं और एक तू’ हे मजेदार जुने गीत निवडले आहे.मी हे गीत निवडले कारण,ज्या पद्धतीने अनिता आणि विभूतीमध्ये एक भन्नाट केमिस्ट्री आहे; त्याच पद्धतीने हे गीतही उत्साही आणि मजेदार आहे.ती एक मजेदार जोडी आहे, ते भांडण करतात,प्रेम करतात,एकमेकांच्या सोबतीला उभे राहतात आणि त्यांचा प्रणयही गमतीजमतींनी,आनंदाने भरलेला आहे. यात आम्ही नृत्य दुसऱ्या क्रमांकावर ठेवले आहे आणि संवाद व भावयुक्त अभिनयावर आम्ही लक्ष केंद्रीत करणार आहोत.तांत्रिकृष्ट्या नृत्याचा दर्जा सुमार राहील;परंतु मला खात्री आहे की रसिक अनू आणि विभूच्या अभिनयाचा आनंद लुटतील.” Also Read:म्हणून सौम्या टंडनला 'भाभीजी घर पर है'मधील भूमिकेची वाटायची भीती?