कुशल बद्रिके (Kushal Badrike) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याला 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya Show) या शोमधून चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता सध्या तो 'चला हवा येऊ द्या-कॉमेडीचा गँगवार'मध्ये पाहायला मिळतो आहे. अभिनेता सोशल मीडियावर सक्रीय असून तो या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. दरम्यान आता कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर मजेशीर पोस्ट शेअर केली आहे.
कुशल बद्रिकेने पत्नीसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तो गाडी चालवताना दिसते आणि बायको सराव करताना दिसते आहे. त्याने लिहिले की, लोकांच्या बायका नवऱ्याच्या डोक्यावर थयथयाट करतात , पण माझी बायको… “तिगदा तुई-तुई थुई-थयाट ! करते” एकदा माझ्या मुलाला शाळेत प्रश्न विचारला की, “मोर” कसा नाचतो? तर तो थुई-थुई न म्हणता, “तिगदा तुई तुई थुई ऽऽ” म्हणल्याचं मला स्पष्ट आठवतय! एकदा तर तो, बे पंचे “तिग-दहा” म्हंटल्याचं मी स्वतःच्या कानाने ऐकलंय. लोकांच्या संसाराला नजर लागते, माझ्या संसाराला.. “तिगदा तुई तुई थुई ऽऽ” लागलाय. प्लीज आजच्या पुरतं कुणी जेवायला देईल का ?
कुशल बद्रिकेच्या या पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. सेलिब्रेटींनीही कमेंट्स केल्या आहेत. संतोष जुवेकरने लिहिले, कुश्या. विजू मानेने लिहिले की, बायको कशीही असली तरी असं जाहिरपणे...असो. विशाखा सुभेदारने कमेंट केली, हलकट.. काय चेहेरे करतोयस.. मेलास तु आता.. एका युजरने लिहिले की, दादा बाजूला गायिका बसली आहे याचा अभिमान हवा तुला... दुसऱ्या युजरने लिहिले की, उद्या अनंत चतुर्दशीला बाप्पासोबत विसर्जन करतील त्या तुझं.. डीजे न लावता, तिगदा थुइss थुइss याच म्युझिकवर..