Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 17: ‘बिग बॉस १७’मध्ये मराठी चेहरा दिसणार; 'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडे पती विकी जैनसह एन्ट्री घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 11:21 IST

'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडे पती विकी जैनसह 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

अतिशय वादग्रस्त पण तितकाच आवडीने पाहिला जाणारा ‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो आहे. ‘बिग बॉस ओटीटी २’नंतर आता ‘बिग बॉस हिंदी’चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘बिग बॉस १७’मध्ये कोणते स्पर्धक पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. ‘बिग बॉस १७’च्या स्पर्धकांबाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आता बिग बॉस १७मध्ये मराठमोळा चेहरा पाहायला मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. ‘बिग बॉस १६’मध्ये मराठमोळ्या शिव ठाकरेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. आता या पर्वात अभिनेत्री अंकिता लोखंडे सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.

‘बिग बॉस १७’ची थीम कपल विरुद्ध सिंगल अशी असणार आहे. या पर्वात शफक नाझ, ऐश्वर्या शर्मा, अंजुम फकीह याबरोबर सीमा हैदर आणि सचिन मीनाही सहभागी होणार असल्याची चर्चा रंगली आहे. आता ‘बिग बॉस १७’च्या स्पर्धकांमध्ये पवित्र रिश्ता फेम अंकिता लोखंडेच्या नावाचीही चर्चा रंगली आहे. 'ईटाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘बिग बॉस’च्या टीमकडून अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैनला यंदाच्या पर्वाची ऑफर देण्यात आली आहे.

अंकिता लोखंडेने एकता कपूरच्या ‘पवित्रा रिश्ता’ मालिकेत अर्चना हे पात्र साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. कंगना रणौतच्या मणकर्णिका चित्रपटातही अंकिता झळकली होती. तिने २०२१मध्ये विकी जैनशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. स्टार प्लसवरील ‘स्मार्ट जोडी’मध्येही अंकिता विकी जैनसह सहभागी झाली होती.

टॅग्स :बिग बॉसअंकिता लोखंडेमराठी अभिनेता