Join us
Daily Top 2Weekly Top 5

“तुम्ही गेल्यानंतर तीन दिवस...”, वडिलांच्या निधनानंतर अंकिता लोखंडेने शेअर केली भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 15:17 IST

वडिलांच्या आठवणीत अंकिता भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाली...

‘पवित्रा रिश्ता’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. या मालिकेतील अर्चनाच्या भूमिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. शनिवारी(१२ ऑगस्ट) अंकिताचे वडील शशिकांत लोखंडे यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने अंकिताच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. वडिलांच्या निधनानंतर अंकिताने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे.

अंकिताचं तिच्या वडिलांबरोबर खास नातं होतं. त्यांच्या निधनानंतर अंकिताने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन वडिलांबरोबरचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून अंकिताने वडिलांबरोबरचे काही खास क्षणांचे फोटो शेअर केले आहेत.

Independence Day 2023: “तेरी मिट्टी में मिल जावा...”, अमृता फडणवीसांनी गायलेलं गाणं ऐकलंत का?

वडिलांच्या आठवणीत अंकिता भावुक

“हॅलो डॅडी, मी तुम्हाला शब्दांत मांडू शकत नाही. पण, तुमच्यासारखा खंबीर, प्रेम वाटावा असावा आणि उत्साही मनुष्य मी पाहिलेला नाही. तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला जास्त समजू शकले. तुम्हाला बघायला येणारा प्रत्येक माणूस तुमची स्तुती करत होता. रोज तुम्ही त्यांना गुड मॉर्निंगचे मेसेज पाठवायचा. कोणाची आठवण आली तर फोन किंवा व्हिडिओ कॉल करुन त्यांच्याशी बोलत होतात. तुम्ही प्रत्येकाबरोबर असलेलं तुमचं नातं जपलं होतं. मलाही या गोष्टी तुमच्यामुळे करायला आवडतात, ही गोष्ट आज मला जाणवत आहे. तुम्ही मला उत्तम आयुष्य, चांगल्या आठवणी आणि नाती जपण्याची शिकवण दिली. कधीही हार न मानण्याची तुम्ही शिकवण दिली. राजासारखं आयुष्य जगायला शिकवलं. तुम्ही नेहमीच माझ्या पंखांना बळ दिलं. तुम्हाला मी कधीच निराश करणार नाही. तुम्ही नेहमीच माझ्या आत्म्याचा एक भाग राहाल. तुमची काळजी घेण्याची संधी मला दिलीत, त्याबद्दल मी आनंदी आहे. तुम्ही गेल्यापासून मागील तीन दिवस पुढे काय करायचं हाच विचार आम्ही करत आहोत. पप्पांचं खाणं, पप्पाचं ब्रेकफास्ट या सगळ्या गोष्टी आता नसतील...कारण, तुम्ही आम्हाला सोडून गेला आहात. आम्हाला खंबीर बनवल्याबद्दल थँक्यू आणि हो, तुम्ही खूप नशीबवान होतात की माझ्या आईसारखी पत्नी तुम्हाला भेटली. तिच्याकडे जे काही होतं ते सगळं तिने तुम्हाला दिलं. मला माहितीये, तुमचं तिच्यावर खूप प्रेम होतं. तिची आम्ही नेहमी काळजी घेऊ, याचं मी तुम्हाला वचन देते. तिला मी नेहमी आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करेन. मी आज जे काही आहे ते तुमच्यामुळे आहे. आय लव्ह यू पापा...पालकांचं मुलांच्या आयुष्यातील स्थान फार महत्त्वाचं असतं...कारण, त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. त्यामुळे पालकांची काळजी घ्या. एकदा ते गेले की परत येत नाहीत. त्यांना आनंद, वेळी, प्रेम सर्वकाही द्या. माझ्या आयुष्यातील सगळ्यात खंबीर आणि हँडसम मनुष्य माझे वडील होते आणि राहतील.”

अक्षय कुमारच्या ‘OMG 2’ साठी शरद पोंक्षेंची पोस्ट, म्हणाले, “हा चित्रपट...”

अंकिता लोखंडेने मालिकांबरोबरच चित्रपटातही काम केलं आहे. कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटातही ती झळकली होती. अंकिताने २०२१मध्ये विकी जैनबरोबर लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली.

टॅग्स :अंकिता लोखंडेमराठी अभिनेता