Join us

मला तुझ्यासाख्या व्यक्तिची गरज होती..., अंकिता लोखंडेसाठी अभिज्ञा भावेची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 15:08 IST

Pavitra Rishta 2.0 : ‘पवित्र रिश्ता 2.0’च्या सेटवर जमली अभिज्ञा-अंकिताची गट्टी

ठळक मुद्दे‘खुलता कळी खुलेना’ मालिकेतील अभिज्ञा भावेच्या भूमिकेला रसिकांनी प्रचंड पसंती दिली होती. मोनिका हे पात्र तिने साकारले होते.

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेचा दुसरा सीझन सध्या चांगलाच गाजतोय. मालिकेच्या पहिल्या सीझनमध्ये सुशांत सिंग राजपूत व अंकिता लोखंडेची (ankita lokhande ) जोडी दिसली होती. ही जोडी कमालीची गाजली होती. सुशांत सिंगच्या निधनानंतर आता दुस-या सीझनमध्ये, सुशांतची जागा शाहीर शेखने घेतली आहे. त्याच्यासोबत अंकिताही या दुस-या सीझनमध्ये मुख्य भूमिकेत आहे.  मराठमोळी अभिनेत्री अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) ही देखील या सीझन महत्त्वाची भूमिका साकारतेय. मालिकेतील कलाकारांसोबत अभिज्ञाची चांगलीच गट्टी जमलीये. खास करून अंकिता लोखंडेसोबत तर तिची घट्ट मैत्री झाली आहे. आपल्या या नव्या मैत्रिणीसाठी अभिज्ञाने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

अंकितासाठी लिहिलेल्या या पोस्टमध्ये अभिज्ञा लिहिते, ‘तू जशी मुलगी आहेस त्यासाठी... तू दर मिनिटाला मला आश्चर्यचकित करतेस. तुझा सळसळता उत्साह, तुझा डान्स, तुझं हृदय सगळं काही एकदम हटके आहे. पवित्र रिश्ता 2.0 च्या निमित्तानं मला तुला भेटता आलं, तुला जाणून घेण्याची संधी मिळाली, याचा मला आनंद आहे.  जे काही आपण ऑफस्क्रिन  शेयर करतो ते रिल लाईफपेक्षा विरुद्ध आहे. मला तुझ्यासारख्या व्यक्तिची प्रचंड गरज होती.  तू मलाही तुझ्या या वेडेपणात सामील करुन घेतलस, याबद्दल तुझे आभार.  खरी मैत्री व्हायला फार वेळ लागत नाही. चल तर मग. हे बंध आणखी घट्ट करत या अतूट मैत्रीच्या प्रवासाला सुरुवात करूयात. आय लव्ह यू माय अर्चना...’

‘खुलता कळी खुलेना’ मालिकेतील अभिज्ञा भावेच्या भूमिकेला रसिकांनी प्रचंड पसंती दिली होती. मोनिका हे पात्र तिने साकारले होते.  मालिकेतील मोनिकाला पाहून रसिकांचा तीळपापड व्हायचा. नकारात्मक मोनिका तिने मोठ्या खूबीने साकारली होती. निगेटीव्ह भूमिका पाहून रसिकांना राग यायचा खरा, मात्र हीच अभिज्ञाच्या सशक्त अभिनयाला मिळालेली पावती होती.

टॅग्स :अंकिता लोखंडेअभिज्ञा भावे