Join us
Daily Top 2Weekly Top 5

पती सुमित महेश्वरीने केलेल्या आरोपांवर पवित्रा पुनियाने सोडलं मौन, म्हणाली- या क्षणी मी फक्त एजाजच्या आठवणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 13:44 IST

पवित्रा तिच्या लव्ह लाईफला घेऊन नेहमी चर्चेत असते.

टीव्ही अभिनेत्री पवित्रा पुनिया 'बिग बॉस 14' च्या घरातून काही दिवसांपूर्वी बाहेर आली आहे. फिनालेच्या फक्त एका आठवड्यापूर्वी, पवित्रने बिग बॉसच्या घराला निरोप दिला. पवित्रा घरात जातानाही आपल्या लव्ह लाईफला घेऊन चर्चेत आली होती, आता ती घराबाहेर पडल्यानंतर सुद्धा  रिलेशनशीपला घेऊन चर्चेत आहे. घरात गेल्यावर पवित्राने सांगितले की, तिचा घटस्फोट झाला आहे. पण पवित्रा बाहेर येताच तिचा नवरा सुमित माहेश्वरी याने तिच्यावर लग्न लपवल्याचा आरोप केला आहे. सुमित म्हणतो, की त्याचा आणि पवित्र्याचा घटस्फोट अद्याप झालेला नाही, ती खोटे बोलते आहे. 

पवित्राने सुमितने केलेल्या आरोपांवर मौन सोडलं आहे. टीएनएशी बोलताना पवित्रा म्हणाली, "मी लवकरच या संदर्भात उत्तर देईन." खरं सांगायचं तर माझ्यासाठी ही फार महत्वाची गोष्ट नाही. माझ्याकडे सध्या या विषयावर बोलण्यासारखे काही नाही. या क्षणी मी फक्त एजाज खानच्या आठवणीत आहे. मी बिग बॉसचे लाइव्ह व अनकट व्हिडिओ पहाते आहे. मी बघतेय की एजाज मला किती मिस करतोय. मी याचा आनंद घेत आहे, मी कोणत्याही अनावश्यक विषयावर विचार करून किंवा बोलून या सुंदर आठवणी खराब करू इच्छित नाही. 

एजाज सोबतच्या नात्याबद्दल बोलताना पवित्र म्हणाली, 'मला सध्या याविषयी काही कल्पना नाही. त्याला बाहेर येऊ द्या मग बघू.' आमचे बॉडिंग स्ट्रॉंग आहे हे मात्र नक्की. एजाज खानने अलीकडेच आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी खुलासा केला होता, तेव्हा पवित्राने सोशल मीडियावर त्यांच्यासाठी एक भावूक पोस्ट लिहिली होती. पवित्रा घराबाहेर पडून एजाजला सपोर्ट करते आहे. 

टॅग्स :बिग बॉस १४