Join us

Shreya Bugade : “तू फक्त माझा...”, श्रेया बुगडेनं या बॉलिवूड सुपरस्टारसाठी लिहिली खास पोस्ट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 17:57 IST

Shreya Bugade : होय, श्रेयानं बॉलिवूड सुपरस्टारचा एक फोटो पोस्ट केला आहे, सध्या त्याचीच चर्चा आहे....

शाहरुख खान व दीपिका पादुकोणच्या ‘पठाण’ या चित्रपटानं सध्या सर्वांनाच वेड लावलं आहे. चार वर्षानंतर किंगखान रूपेरी पडद्यावर परतला आहे आणि त्याच्या सिनेमावर लोकांच्या उड्या पडत आहेत. सगळेच शाहरूखच्या प्रेमात पडले आहेत. ‘चल हवा येऊ द्या’ फेम श्रेया बुगडेही ( Shreya Bugade) त्यापैकीच एक. होय, श्रेयाही शाहरूखची ‘दिवानी’ झाली आहे. 

श्रेया शाहरूखची जबरा फॅन आहे. आता शाहरूखचा सिनेमा लागला म्हटल्यावर श्रेया तो कसा चुकवणार. अलीकडे श्रेयाने ‘पठाण’ पाहिला. पण त्याआधीर चित्रपटगृहांबाहेर शाहरूखचं पोस्टर लागलं होतं. ते पाहून श्रेया जणू वेडी झाली. पोस्टरला किस करत तिने फोटो काढला. इतकंच नाही तर हा फोटो इन्स्टास्टोरीवर शेअरही केला. या फोटोला तिने दिलेल्या कॅप्शनची सध्या जोरदार चर्चा आहे. यु आर माईन अर्थात तू फक्त माझा आहेस..., असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.

चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून श्रेया बुगडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. श्रेयाच्या कॉमेडीचे आणि तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. यशोमुळे श्रेयाला अफाट प्रसिद्धी मिळाली आहे. श्रेयाचा मोठा चाहतावर्ग आहे. अगदी कमी वयात अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवणा-या श्रेयानं नाटक, टीव्ही या माध्यमांमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘तू तिथे मी’, ‘अस्मिता’, ‘फू बाई फू’ अशा मालिकांमधून श्रेयाने मराठी रसिकांवर जादू केली आहे. मराठीसह इंग्रजी, हिंदी, गुजराती भाषेतही नाटकं सादर केली आहेत.    

टॅग्स :श्रेया बुगडेशाहरुख खानमराठी अभिनेता