Join us

पार्वतीने घेतला भद्रकालीचा अवतार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2016 16:50 IST

'गणपती बाप्पा मोरया' या मालिकेमध्ये नवरात्रीच्या निमित्ताने अत्यंत महत्वाची कथा बघायला मिळणार आहे. या आठवड्यात मालिकेमध्ये पार्वतीने भद्र्कालीचा अवतार ...

'गणपती बाप्पा मोरया' या मालिकेमध्ये नवरात्रीच्या निमित्ताने अत्यंत महत्वाची कथा बघायला मिळणार आहे. या आठवड्यात मालिकेमध्ये पार्वतीने भद्र्कालीचा अवतार घेतल्याच पाहायला मिळणार आहे. रावण कठोर तप करून महादेवांना प्रसन्न करून घेतो.महादेव रावणाची भक्ती आणि तप बघून त्यावर प्रसन्न देखील होतात. रावण ब्रम्हदेवांच्या सांगण्यावरून महादेवांकडे शक्ती मागतात कारण शक्ती शिवाय शिव अपूर्ण आहे, शक्ती जर रावणाबरोबर लंकेत आली तर तिच्या बरोबर महादेव देखील लंकेत येतील. गणेशाच्या सांगण्यावरून पार्वती रावणाच्या मागोमाग जायला राजी होते. रावण शक्तीला घेऊन लंकेत जायला निघतो. गणेश रावणाला अट घालतो की लंकेत पोहोचेपर्यंत त्याने मागे वळून जर पाहिले तर शक्ती वाचनातून मुक्त होईल. भूलोकावर नारदांच्या रूपात गणपती रावणाला संभ्रमात टाकून मागे बघायला भाग पाडतो. आराध्यांवर अविश्वास दाखवला म्हणून शक्ती रौद्र रूप धारण करते. गणेश महादेवांना आदेश करतो महादेव भद्रकालीच्या पायाखाली शरण जातात आणि तिचा क्रोध आपोआप शांत होतो.गणेशाच्या आशीर्वादाने पार्वती तिथे भद्रकाली रूपातवास्तव्य करू लागते. गणपती बाप्पा मोरयामध्ये प्रेक्षकांना हि कथा बघायला मिळणार आहे.