Join us

'पारू' मालिका रोमांचक वळणावर, आदित्यकडून पारूला साडी भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 12:35 IST

Paru Serial : 'पारू' या मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. आता ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आली आहे. या मालिकेत रोज काहीतरी घडामोडी घडताना दिसत आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'पारू' (Paru Serial) या मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. आता ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आली आहे. या मालिकेत रोज काहीतरी घडामोडी घडताना दिसत आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे, या मालिकेत मारुतीने पारूच्या लग्नाची तयारी चालू केली आहे. दुसरीकडे प्रीतमच्या साखरपुड्याची तयारी ही जोरात सुरु आहे. 

आता लग्न घर म्हटलं की अनेक कामे आणि जबाबदाऱ्या त्यातली एक मोठी जबाबदारी म्हणजे वर आणि वधूची खरेदी. तर ⁠संपूर्ण किर्लोस्कर कुटुंब साडी खरेदीसाठी आणि बाकी खरेदीसाठी बाहेर आहे. तिथे दुकानात सुंदर-सुंदर साड्या पाहून आदित्यच्या डोक्यात पारूच्या विचार येतो आणि तो पारूसाठी एक साडी विकत घेतो. किर्लोस्करांकडे लग्नासोबत गुढी पाडव्याची लगबग सुरु आहे, त्यातच  आदित्यला कुणकुण लागते की पारूचा होणारा नवरा हा बरा माणूस नाही. म्हणून त्यांनी ठरवले आहे की पारूची ह्यातुन सुटका करायची. इकडे प्रीतमची भेट एका मुलीशी होते आणि बघता क्षणी तो तिच्या प्रेमात पडतो.  आता काय होईल जेव्हा अहिल्याला आदित्यच्या प्लॅन बद्दल कळेल? हे सगळं जाणून घेण्यासाठी आगामी भाग पाहावी लागेल.

ट्रम्प कार्ड प्रोडक्शनने पारू मालिकेची निर्मिती केली असून मालिकेचे पटकथा लेखन केले आहे किरण कुलकर्णी यांनी तर संवाद लेखक इरफान मुजावर हे आहेत. या मालिकेचे दिग्दर्शन राजू सावंत करत आहेत. यात नटखट अवखळ निष्पाप पारूची भूमिका साकारणार आहे 'शरयू सोनावणे'. तिच्यासोबत प्रसाद जवादे, मुग्धा कर्णिक, अनुप साळुंखे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.