Join us

पार्थ समथान म्हणतो, अनुराग आणि माझ्यात आहे हे साम्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 06:30 IST

आपला प्रामाणिकपणा आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर स्टार प्लसवरील ‘कसौटी झिंदगी के’मधील अनुराग बसू प्रेक्षकांची मने जिंकत आहे.

ठळक मुद्देपार्थ समथान हा आईवेडा, आईचा एक आज्ञाधारक मुलगा आहे. ‘कसौटी झिंदगी के’मधील अनुराग बसू प्रेक्षकांची मने जिंकतो आहे

आपला प्रामाणिकपणा आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर स्टार प्लसवरील ‘कसौटी झिंदगी के’मधील अनुराग बसू प्रेक्षकांची मने जिंकत आहे. तो एक आदर्श मुलगा असून मालिकेत त्याचे त्याची आई मोहिनी हिच्याशी असलेले नाते सर्वच तरुणींना हृदयस्पर्शी वाटते. पण वास्तव जीवनातही अनुराग म्हणजेच अभिनेता पार्थ समथान हा आईवेडा, आईचा एक आज्ञाधारक मुलगा आहे.

आपल्या या नात्याविषयी पार्थ म्हणाला, “अनुरागप्रमाणेच वैयक्तिक जीवनातही माझे माझ्या आईशी एक खास नाते आहे. मी आईचाच लाडका मुलगा आहे. मी मनाने तिच्या अगदी निकट असून माझ्या दृष्टीने ती जगातील श्रेष्ठ आई आहे. माझ्या आयुष्यात माझ्या आईचेच स्थान सर्वोच्च राहील. माझ्या आईला माझा अभिमान वाटेल आणि तिच्या चेहऱ्यावरस्मितहास्य कायम राहील, यासाठीच मी सतत प्रयत्न करीत असतो. तीच माझी सर्वोत्तम, जिवलग मित्र असून प्रत्येक बारीकसारीक गोष्टींमध्ये मी तिचा सल्ला घेतो.”

प्रत्येक मुलीला आपल्या स्वप्नातील आदर्श पुरुष असाच असावा, हे केवळ अनुराग बसूनेच नव्हे, तर पार्थ समथाननेही वारंवार दाखवून दिले आहे. ‘स्टार प्लस’वरील ‘कसौटी झिंदगी के’मधील अनुराग बसू ही व्यक्तिरेखा पार्थने जिवंत केली असून त्या भूमिकेला त्याने पुरेपूर न्याय दिला आहे, असे सर्वच समीक्षकांचे मत बनले आहे. 

टॅग्स :कसौटी जिंदगी की 2स्टार प्लस