Join us
Daily Top 2Weekly Top 5

'माझी तुझी रेशीमगाठ'मधली परी उर्फ मायरा वायकुळचं छोट्या पडद्यावर कमबॅक, दिसणार या शोमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 13:22 IST

Myra Vaikul : 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली बालकलाकार म्हणजे मायरा वायकुळ. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली बालकलाकार म्हणजे मायरा वायकुळ (Myra Vaikul). तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिका बंद झाली असली तरी प्रेक्षकांच्या मनातील परीचं घर कायम आहे. आता मायराच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. मायरा लवकरच छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. याबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. तर मायरा वायकुळ झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या शोमध्ये पाहायला मिळणार आहे.

बालकलाकार मायरा वायकुळ चला हवा येऊ द्या शोमध्ये पाहायला मिळणार आहे. झी मराठी वाहिनीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर या शोचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. हा प्रोमो शेअर करत लिहिले आहे की,  बच्चे कंपनीची कॉमेडी असणार आहे खास! ‘चला हवा येऊ द्या’ लहान तोंडी मोठा घास. १५ मे पासून,सोम - मंगळ,रात्री ९.३० वाजता. 

या प्रोमोत पाहायला मिळतंय की, भाऊ कदम आणि श्रेया बुगडे शाळेच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. मायरा आणि तू चाल पुढं मालिकेतील बालकलाकार रेयांश जुवटकर पाहायला मिळत आहेत. मायराने साडी आणि रेयांशने मोठ्यासारखे शर्ट पॅण्ट घातली आहे. व्हिडीओत भाऊ कदम त्यांना बोलतो की, वयात लहान आहात तर लहानांसारखं वागायचं. त्यावर मायरा बोलते वयाने लहान आहोत पण कॉमेडीत नाही. त्यावर श्रेया म्हणाली आम्हाला नाही शिकवायचं. त्यावर रेयांश म्हणतो तुम्हाला नाही शिकवणार..तुमच्यासोबत येऊन सर्वांना हसवणार. लहान तोंडी मोठा घास.चला हवा येऊ द्या शोमध्ये मोठ्यांसोबत बच्चे कंपनीदेखील पाहायला मिळणार आहे. हा प्रोमो पाहून या कार्यक्रमाची प्रेक्षकांमधील उत्सुकता आणखी वाढली आहे.
टॅग्स :मायरा वैकुलचला हवा येऊ द्या