Join us
Daily Top 2Weekly Top 5

पेहेरेदार पिया की या मालिकेमुळे तेजस्वी प्रकाश वायंगणकरचे स्वप्न झाले पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2017 16:05 IST

तेजस्वी प्रकाश वायंगणकर पेहेरेदार पिया की या मालिकेत दिया ही भूमिका साकारत आहे. या मालिकेमुळे तिचे अनेक वर्षांपासूनचे एक ...

तेजस्वी प्रकाश वायंगणकर पेहेरेदार पिया की या मालिकेत दिया ही भूमिका साकारत आहे. या मालिकेमुळे तिचे अनेक वर्षांपासूनचे एक स्वप्न नुकतेच पूर्ण झाले आहे. त्यामुळे ती सध्या खूपच खूश आहे. एखादी विंटेज कार चालवायला मिळावी असे तेजस्वीचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न होते. तिने आजवरच्या तिच्या आयुष्यात कधीच विंटेज कार चालवण्याची संधी मिळाली नव्हती. पण या मालिकेतील एका दृश्यात तिला विंटेज कार चालवायला मिळाली असल्याने ती प्रचंड आनंदित झाली आहे. तिने नुकतीच उद्यपूरमध्ये ही कार चालवली. सध्याची आधुनिक कार चालवणे आणि विंटेज कार चालवणे यात खूप फरक आहे. कारण आपल्या आजच्या आधुनिक कारच्या तुलनेत ही कार खूपच वेगळी आहे. त्यामुळे ती विंटेज कार चालवायला शिकली. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण मालिकेचे चित्रीकरण सुरू व्हायच्या आधी सुमारे दहा महिने तिने विंटेज कार चालवण्याचा सराव केला. याविषयी तेजस्वी सांगते, मला नेहमीच विंटेज कारविषयी आकर्षण वाटत असे. परंतु मला ती चालवण्याची संधी कधीच मिळाली नाही. पहेरेदार पिया या की या मालिकेमुळे मला एक वेगळा अनुभव घेता आला.  पेहेरेदार पिया या मालिकेत नऊ वर्षांचा रतन हर्षवर्धन सिंग म्हणजेच अफान खान आणि 18 वर्षांची मुलगी दिया यांच्यातील असामान्य विवाहाची कथा दाखवण्यात आली आहे. दिया आपल्या स्वतःच्या स्वप्नांचे बलिदान देते आणि रतनशी संरक्षक म्हणून विवाह करते. या मालिकेतील व्यक्तिरेखांची जीवनशैली आणि त्यांचे रूप हे राजेशाही आहे. त्यांचे रूप मालिकेत खूप चांगले दिसावेयासाठी या मालिकेच्या टीमने खूप संशोधन केले आहे. Must Read : वादळामुळे पहरेदार पिया कीचे चित्रीकरण झाले विस्कळीत