Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रीयात 'परदेस में है मेरा दिल'ची शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2016 13:30 IST

'नागिन' या मालिकेत अर्जुनन बिजलानीने लोकप्रियता मिळवील. मात्र नागिन सिझन 2मध्ये अर्जुन नसणार आहे. मात्र त्याच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर ...

'नागिन' या मालिकेत अर्जुनन बिजलानीने लोकप्रियता मिळवील. मात्र नागिन सिझन 2मध्ये अर्जुन नसणार आहे. मात्र त्याच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. सध्या ऑस्ट्रीयामध्ये 'परदेस में है मेरा दिल' या नव्या मालिकेची टीम शूटिंगमध्ये बिझी आहे.  अर्जुनसह 'मधुबाला' फेम दृष्टी धामीही मालिकेत झळकणार आहे. ही मालिका बघितल्यानंतर रसिकांना शाहरूखच्या परदेस या सिनेमाची आठवण झाल्याशिवाय राहाणार नाही. कारण परदेस सिनेमाची  मिळती जुळती कथा मालिकेची असणार असल्याच्या चर्चा आहेत. सध्या ऑस्ट्रीयामध्ये या मालिकेच्या शूटिंगला सुरुवातही झाली आहे. अर्जुन या मालिकेत एनआरआयच्या भूमिकेत दिसणार असून सुट बुट घातलेला हटके लुक अर्जुनने सोशल मीडियावर शेअर केला आहे.आता पुन्हा एकदा नव्या भूमिकेत, नव्या ढंगात तुमच्या समोर येतो आहे त्यामुळे तसेच प्रेम करत राहा असे अर्जुनने त्याच्या चाहत्यांसाठी मेसेजही दिला आहे.