परदेस में है मेरा दिल या मालिकेतील आदिता गुप्ताचे झाले ब्रेकअप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2017 15:31 IST
परदेस में है मेरा दिल या मालिकेत संजनाची भूमिका साकारणाऱ्या आदिती गुप्ताचे नुकतेच ब्रेकअप झाले आहे. तिच्या आणि तिचा ...
परदेस में है मेरा दिल या मालिकेतील आदिता गुप्ताचे झाले ब्रेकअप
परदेस में है मेरा दिल या मालिकेत संजनाची भूमिका साकारणाऱ्या आदिती गुप्ताचे नुकतेच ब्रेकअप झाले आहे. तिच्या आणि तिचा प्रियकर रिझवान बचाव यांच्या दोन वर्षांच्या नात्याला तिने पूर्णविराम दिला असल्याचे म्हटले जात आहे. आदितीने स्वतःच ही गोष्ट मीडियाला सांगितली आहे. आदिती गुप्ता आणि रिझवान बचाव हे गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांचे चांगले फ्रेंड्स आहेत. रिझवान हा एक इन्व्हेस्टमेंट बँकर असून तो निर्माती एकता कपूरचा खूप चांगला मित्र आहे तर आदितीदेखील एकताची चांगली मैत्रीण आहे. एकतामुळेच रिझवान आणि आदितीची ओळख झाली होती. त्यांच्या ओळखीचे मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. गेल्या दोन वर्षांपासून त्या दोघांचे अफेअर सुरू आहे. त्या दोघांना अनेकवेळा पार्टीजमध्येदेखील एकत्र पाहायला मिळते. त्यांनी कधीच त्यांचे नाते मीडियापासून लपवले नाही. पण आता त्यांनी दोन वर्षांच्या नात्यानंतर ब्रेकअप करण्याचे ठरवले आहे.आदिती परदेस में है मेरा दिल या मालिकेतील लक्ष लालवाणीच्या प्रेमात पडल्यामुळे तिने रिझवानसोबत असलेले नाते संपुष्टात आणल्याचे म्हटले जात आहे. परदेस में है मेरा दिल या मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी लक्ष आणि आदिती दोघांच्या खूप जवळ आले असून ही गोष्ट रिझवानला कळल्याने त्यांच्यात ब्रेकअप झाल्याचे म्हटले जाते. आदितीने ब्रेकअप झाल्याचे कबूल केले असले तरी ते लक्षमुळे झाले नसल्याचे तिचे म्हणणे आहे. याविषयी आदिती सांगते, "रिझवान आणि मी ब्रेकअप केले हे खरे असले तरी मी सध्या सिंगल आहे. लक्ष हा माझा केवळ सहकलाकार आहे."