Join us
Daily Top 2Weekly Top 5

​परदेस में है मेरा दिल या मालिकेत केले जाणार सरोगसीवर भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2017 15:35 IST

परदेस में है मेरा दिल या मालिकेची कथा प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. टिआरपी रेसमध्येदेखील ही मालिका सध्या अव्वल ठरत ...

परदेस में है मेरा दिल या मालिकेची कथा प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. टिआरपी रेसमध्येदेखील ही मालिका सध्या अव्वल ठरत आहे. या मालिकेतील नैना आणि राघवची केमिस्ट्री तर प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या मालिकेमुळे दृष्टी धामी आणि अर्जुन बिजलानीच्या लोकप्रियतेत सध्या चांगलीच वाढ झाली आहे. परदेस में है मेरा दिल या मालिकेच्या कथानकाला लवकरच एक वळण मिळणार असून या मालिकेत सरोगसीवर भाष्य केले जाणार आहे. दिल से दिल तर ही सरोगसीवर आधारित असलेली मालिका सध्या प्रेक्षकांना कलर्स वाहिनीवर पाहायला मिळत आहे. या मालिकेत रश्मी देसाई, सिद्धार्थ शुक्ला, जस्मिन भसीन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या मालिकेनंतर आता हा ट्रॅक प्रेक्षकांना परदेस में है मेरा दिल या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत नुकतीच विनित रैना आणि अदा खान यांची एंट्री झाली आहे. अदाने नागिन या मालिकेत साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. त्यामुळे अदाच्या एंट्रीमुळे तिच्या फॅन्सना चांगलाच आनंद झाला आहे. मालिकेतील विनित आणि अदा या जोडप्याला मूल होणार नसल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आपल्याला मूल होणार नसल्याने हे जोडपे खूपच दुःखी आहे. त्यांचे हे दुःख पाहून नैनालादेखील खूप वाईट वाटत आहे. राघवसोबत नैनाचा लवकरच घटस्फोट होणार आहे. नैनाच्या या वाईट वेळात या जोडप्याने तिला खूप मदत केली आहे. त्यामुळे या जोडप्यासाठी सरोगेट मदर बनण्याचे नैना ठरवणार आहे. पण ही गोष्ट नैना राघवपासून लपवून ठेवणार आहे. याचा परिणाम राघव आणि नैनाच्या नात्यावर काय होतो हे पाहाणे मनोरंजक ठरणार आहे.