Join us

'आधीच जाहीर करते, प्रसिध्दी मिळवण्यासाठी हा फोटो',पल्लवी पाटीलचा अंदाज पाहून वाटेल आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 18:32 IST

पल्लवी पाटीलने 'बापमाणूस', 'रुंजी, 'अग्निहोत्र 2' अशा मालिकांमधून आपला ठसा उमटवला आहे.आजही पल्लवी 'रुंजी' मालिकेमुळेच जास्त ओळखली जाते. 

'रुंजी' मालिकेमुळे घराघरात लोकप्रिय झालेली पल्लवी पाटील सध्या प्रचंड चर्चेत आहे. सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय असून चाहत्यांच्या नजरा वेधून घेत असते. गेल्या काही महिन्यांपासून ती सतत तिचे बोल्ड फोटो शेअर करत चाहत्यांची पसंती मिळवत आहे.तिच्या बोल्ड फोटोंची वारंवार चर्चा होत असते. पल्लवीच्या सोशल मीडियावरील अशाच हॉट आणि सेक्सी फोटोंची खुमासदार चर्चा रंगलेली असते. 

 या प्रत्येक फोटोमध्ये तिचा खास आणि हटके अंदाज पाहायला मिळतो. सोशल मीडियावर तिने असे अनेक बोल्ड फोटो शेअर केले आहेत. पुन्हा एकदा तिने तिचा बोल्ड लूक शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोत पल्लवीचा बोल्ड लूक आणि बिनधास्त अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच आहे.

पल्लवीचा ब्युटी इन ब्लॅक अंदाज कुणालाही घायाळ करणारा असाच म्हणावा लागेल. पूर्णपणे ब्लॅक शेडमध्ये असलेला फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. ऑन एंड ऑफ स्क्रीन बोल्ड लूकमुळे चर्चेत असणारी पल्लवी प्रत्यक्ष जीवनातही बिनधास्त आणि रोखठोक आहे. विशेष म्हणजे पल्लवीने हा फोटो शेअर करत लिहीलंय की, ''आधीच जाहीर करते, प्रसिध्दी मिळवण्यासाठी हा फोटो आहे.कष्ट नको फार. 🙂🤗 बाकी प्रेम आहेच ❤️'' याआधीही पल्लवी तिच्या बिकीनी लूकमुळे चर्चेत होती. फोटो शेअर करत तिने सोशल मीडियावर एकच धुमाकुळ घातला होता. 

याशिवाय तिच्या पर्सनल लाईफमुळेही ती चर्चेत असते. पल्लवी पाटीलचे अभिनेता संग्राम समेळसोबत लग्न झाले होते. 2016 दोघांनीही लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली होती. पण दोघांचेही नाते फार काळ काही टिकले नाही. त्यामुळे दोघांनीही घटस्फोट घेत वेगळे झाले. त्यानंतर संग्राम समेळने श्रद्धा फाटकसोबत दुसरे लग्नही केले.

 

सध्या पल्लवी वैदेही मालिकेत झळकत आहे. आगामी काळात 'ग्रे' या मराठी सिनेमातही ती झळकणार आहे. यापूर्वी पल्लवीनं 'बापमाणूस', 'रुंजी, 'अग्निहोत्र 2' अशा मालिकांमधून आपला ठसा उमटवला आहे.आजही पल्लवी 'रुंजी' मालिकेमुळेच जास्त ओळखली जाते. 

टॅग्स :पल्लवी पाटील