Join us

​पहेरदार पिया की या मालिकेवर बंदी आणण्याची प्रेक्षकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 15:11 IST

'पहरेदार पिया की' या मालिकेत प्रेक्षकांना 9 वर्षांचा रतन हर्षवर्धन सिंह म्हणजेच अफान खान आणि 18 वर्षांची मुलगी दिया ...

'पहरेदार पिया की' या मालिकेत प्रेक्षकांना 9 वर्षांचा रतन हर्षवर्धन सिंह म्हणजेच अफान खान आणि 18 वर्षांची मुलगी दिया म्हणजेच तेजस्वी वायंगणकर यांच्या असामान्य विवाहाची कहाणी पाहायला मिळत आहे. दिया आपल्या स्वतःच्या स्वप्नांचे बलिदान देऊन रतनच्या रक्षणार्थ त्याच्याशी विवाह करते अशी या मालिकेची कथा आहे. ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेची कथा प्रेक्षकांच्या पचनी पडत नसल्याचे पाहायला मिळतंय. एक लहान मुलगा आणि एक तरुण मुलगी यांच्यात प्रेमकहानी कशी असू शकते? असा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. उगाच 'सब कुछ बिगता है'च्या नादात सुरू करण्यात आलेल्या या मालिकेला प्रेक्षकांच्या रागाचा चांगलाच सामना करावा लागतोय. सोशल मीडियावर या मालिकेच्या विरोधात अनेक जण आपली मते नोंदवत आहेत.आता तर पहरेदार पिया की ही मालिका लवकरात लवकर बंद करण्यात यावी अशी मागणी प्रेक्षक करताना दिसतायेत. यासाठी प्रेक्षकांनी स्वाक्षरी मोहीमच सुरू केली आहे. ही मालिका बंद कऱण्यात यावी यासाठी सह्या घेतल्या जात आहे. ही मोहीम सोशल मीडियावर सुरू असून आतापर्यंत ७५ हून अधिक लोकांनी यावर सह्या केल्या आहेत.पहरेदार पिया की या मालिकेत दाखवण्यात आलेले रतन आणि दिया यांचे लग्न प्रेक्षकांना पटले नव्हते आणि त्यात आता ते दोघे हनिमूनला जाणार असल्याचे दाखवण्यात येणार आहे. या गोष्टीमुळे तर प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत. एवढेच नव्हे तर या मालिकेतील अनेक संवाद हे आक्षेपार्ह असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. तसेच रतन अनेकवेळा आपल्या वागणुकीतून दियाचे मन जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचे आपल्याला दिसत आहे. अशाप्रकारच्या मालिका दाखवणे हे चुकीचे आहे असे म्हणत लोकांनी या मालिकेच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे.  Also Read : ​Shocking! पहरेदार पिया की मालिकेतील रतन आणि दिया जाणार हनिमूनला