Join us
Daily Top 2Weekly Top 5

'पारू' फेम अभिनेत्रीने घेतली नवी कोरी कार, व्हिडीओतून चाहत्यांना दाखवली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 13:30 IST

पारू मालिकेतील अभिनेत्रीने नवी कोरी गाडी खरेदी केली आहे. सोशल मीडियावरुन अभिनेत्रीने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.

आपल्याकडेही एखादी आलिशान कार असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. अनेक मराठी सेलिब्रिटींकडेही महागड्या गाड्या आहेत. आता आणखी एका मराठी अभिनेत्रीने घरी नवी पाहुणी आणली आहे. पारू मालिकेतील अभिनेत्रीने नवी कोरी गाडी खरेदी केली आहे. सोशल मीडियावरुन अभिनेत्रीने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने गाडीची झलकही चाहत्यांना दाखवली आहे. 

पारू मालिकेत प्रिया हे पात्र अभिनेत्री संजना काळे साकारत आहे. संजनाने नुकतीच आलिशान गाडी खरेदी केली आहे. रेनॉल्ट या कंपनीची लाल रंगाची कार संजनाने घेतली आहे. या गाडीची किंमत सुमारे ६ ते १० लाख रुपयांच्या घरात आहे. व्हिडीओमध्ये संजना तिच्या कुटुंबासोबत कार खरेदी करायला गेल्याचं दिसत आहे. स्वप्नातली गाडी घेतल्यानंतर अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर हास्य उमटल्याचं दिसत आहे. संजनाच्या या व्हिडीओवर कमेंट करत चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलं आहे. 

संजनाने काही नाटकांमध्येही काम केलं आहे. पारू मालिकेतून ती प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. या मालिकेत प्रसाद जवादे आणि शरयू सोनावणे मुख्य भूमिकेत आहेत. मालिकेतील आदित्य आणि पारूची जोडीही प्रेक्षकांना आवडते. तर मुग्धा कर्णिक साकारत असलेली अहिल्यादेवी या भूमिकेवरही चाहते प्रेम करतात.  

English
हिंदी सारांश
Web Title : 'Paru' Fame Actress Buys New Car, Shares Glimpse with Fans

Web Summary : Actress Sanjana Kale, known for her role in 'Paru,' recently purchased a new Renault car. She shared a video on social media showcasing the car and her family's joy. Fans congratulated her on this new acquisition. Sanjana also worked in theater.
टॅग्स :टिव्ही कलाकारझी मराठीकार