Join us
Daily Top 2Weekly Top 5

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत हा कलाकार साकारतो महत्त्वाची भूमिका, ओळखा पाहू कोण आहे हा कलाकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 12:00 IST

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील चंपकलाल तर प्रेक्षकांना खूप आवडतात. चंपकलाल आणि जेठालाल या बाप-मुलातील केमिस्ट्री तर प्रेक्षकांना चांगलीच भावते. चंपकलाल हे मालिकेत वृद्ध गृहस्थ दाखवले आहे. त्यांचा नातूच आता कॉलेजमध्ये असल्याचे दाखवण्यात आले आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या मालिकेला आज दहा वर्षांहून अधिक वर्षं झाले असले तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. ही मालिका प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन करत आहे. टिआरपीच्या रेसमध्ये तर ही मालिका नेहमीच अव्वल राहिली आहे.तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील चंपकलाल तर प्रेक्षकांना खूप आवडतात. चंपकलाल आणि जेठालाल या बाप-मुलातील केमिस्ट्री तर प्रेक्षकांना चांगलीच भावते. चंपकलाल हे मालिकेत वृद्ध गृहस्थ दाखवले आहे. त्यांचा नातूच आता कॉलेजमध्ये असल्याचे दाखवण्यात आले आहे. म्हणजे मालिकेतील व्यक्तिरेखेनुसार त्यांचे वय ६५-७० च्या दरम्यान आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, खऱ्या आय़ुष्यात चंपकलालची भूमिका अमित भट साकारत आहे. अमित भट खऱ्या आयुष्यात खूपच तरुण आहे. तो केवळ ४३ वर्षांचा आहे. या मालिकेत त्याच्या मुलाच्या भूमिकेत दिलीप जोशी आहे. दिलीप खऱ्या आयुष्यात अमितपेक्षा वयाने पाच वर्षांनी मोठा आहे. अमित हा गुजराती रंगभूमीवरचा प्रसिद्ध अभिनेता असून त्याने अनेक गुजराती नाटकांमध्ये काम केले आहे. खऱ्या आयुष्यात त्याचे लग्न झालेले असून त्याला दोन जुळी मुले आहेत. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने अमित भटला लोकप्रियता मिळाली. या मालिकेसाठी मेकअप करायला अमितला अनेक तास लागतात. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील गोकुळधाम सोसायटीतील सगळे सदस्य हे एखाद्या कुटुंबियांसारखे असल्याचे मालिकेत दाखवण्यात आले आहे. खऱ्या आयुष्यात देखील ही मंडळी एखाद्या कुटुंबियांसारखी असून ते अनेकवेळा एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात. एवढेच नव्हे तर त्यांच्या सगळ्यांची कुटुंबं देखील त्यांच्यासोबत असतात. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा