Join us

​खुलता कळी खुलेना फेम ओमप्रकाश शिंदे म्हणजेच विक्रांतची अशी झाली होती फजिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 16:19 IST

​खुलता कळी खुलेना फेम ओमप्रकाश शिंदेची या मालिकेच्या एका दृश्याचे चित्रीकरण करताना चांगलीच फजिती झाली होती.

खुलता कळी खुलेना ही मालिका सुरुवातीासूनच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेचे शीर्षकगीत तर प्रेक्षकांना खूप आवडते. पण आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.ओमप्रकाश शिंदेच्या करियरमध्ये खुलता कळी खुलेना या मालिकेला प्रचंड महत्त्व आहे. त्याने याआधी का रे दुरावा या मालिकेत काम केले होते. पण या मालिकेतील त्याची भूमिका तितकीशी महत्त्वाची नव्हती. पण खुलता कळी खुलेना या मालिकेत त्याला प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले. ही मालिका संपत असल्याने ओमप्रकाश त्याच्या या मालिकेच्या संबंधीत जुन्या आठवणींना उजाळा देत आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याच मालिकेच्या संबंधित एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओतून त्याने मालिकेतील एका दृश्याचे चित्रीकरण करताना किती मजा आली होती हे सांगितले आहे. खरे तर हे दृश्य खूप महिन्यांपूर्वी चित्रीत करण्यात आले होते. पण बहुधा ही मालिका संपणार म्हणून त्याने आता या दृश्याविषयी त्याच्या फॅन्सना सांगितले आहे. Also Read : अभिनेत्री बनण्यापूर्वी हे काम करायची अभिज्ञा भावे!ओमप्रकाश शिंदेने इन्स्टाग्रामला हा व्हिडिओ पोस्ट करताना एका टेक असाही झालेला असे म्हटले आहे. या मालिकेत आपल्याला अनेक महिन्यांपूर्वी एक दृश्य पाहायला मिळाले होते. या दृश्यात मोनिका गरोदर असताना पडते आणि विक्रांत तिला उचलून घेतो असे आपल्याला दाखवण्यात आले होते. या दृश्याचे चित्रीकरण करताना ओमप्रकाशची चांगलीच दमछाक झाली होती. काही केल्या मोनिकाला त्याला उचलता येत नव्हते. त्यामुळे त्याची चांगलीच फजिती झाली होती.ओमप्रकाशची फजिती कशी झाली होती, दे दृश्य चित्रीत करताना किती धमाल आली हे तुम्हाला पाहायचे असेल तर हा व्हिडिओ नक्कीच पाहा.