Join us

​फवाद करणार ‘कॉफी’चं ओपनिंग ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 15:14 IST

'कॅाफी विथ करण' या शोमध्ये प्रसिद्ध कलाकार हजेरी लावत असतात. या कलाकारांचं खाजगी आयुष्य उलगडताना करण जोहरला आपण पाहिलंय. यंदाच्या ...

'कॅाफी विथ करण' या शोमध्ये प्रसिद्ध कलाकार हजेरी लावत असतात. या कलाकारांचं खाजगी आयुष्य उलगडताना करण जोहरला आपण पाहिलंय. यंदाच्या सिझनमध्ये फवाद खान हा पाकिस्तानी कलाकार हजेरी लावणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांआधी करण जोहरने ट्वीट केले होते की शाहरूख खान या शोमध्ये पहिला पाहुणा असणार आहे. मात्र काही कारणांमुळे आता शाहरूखच्या जागी फवाद खान येणार असल्याचं कळतंय. शोचे चित्रीकरण सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार असून शो लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. फवाद खाननंतर अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय बच्चन, रणबीर कपूर आणि कतरिना कैफ करणच्या शोमध्ये हजेरी लावताना दिसतील.