Join us

फक्त साडी अन्...; मीरा जगन्नाथचा बोल्ड लूक; Video होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 16:59 IST

Mira jagannath: 'अगं तुझं ब्लाऊज कुठे आहे?' मीराच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

बिग बॉस मराठीच्या (bigg boss marathi) माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मीरा जगन्नाथ ( Mira jagannath). टास्क खेळण्याची उत्तम पद्धत आणि स्पष्टवक्तेपणा यामुळे मीराने बिग बॉस मराठीचं तिसरं पर्व चांगलंच गाजवलं. हा शो संपला तरीदेखील मीराची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. उलटपक्षी तिच्या लोकप्रियतेमध्ये कमालीची वाढ झाली आहे. यामध्येच सध्या नेटकऱ्यांमध्ये तिचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.

मीराचा सोशल मीडियावरचा वावर कमालीचा वाढला आहे. त्यामुळे तिने कोणतीही पोस्ट केली की ती क्षणार्धात व्हायरल होते. यामध्ये सध्या नेटकऱ्यांमध्ये तिच्या एका व्हिडीओची चर्चा रंगली आहे. या व्हिडीओमध्ये मीरा सुंदर दिसत असून तिने केलेला लूक चर्चेत आला आहे. 

मीराने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने केलेल्या लूकमध्ये ती बोल्ड दिसून येत आहे. यात तिने पांढऱ्या रंगाची छान सुती साडी परिधान केली आहे. तसंच हे शूट एका निसर्गरम्य ठिकाणी, जंगलात केल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, मीराच्या या पोस्टवर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. इतकंच नाही तर 'अगं तुझं ब्लाऊज कुठे आहे?' असाही प्रश्न काहींनी विचारला आहे. तर, 'कमालीची सुंदर दिसते', 'तुझ्या नजरेतून तू सारं काही व्यक्त करते', असं म्हणत नेटकऱ्यांनी तिच्यावर कमेंटचा पाऊस पाडला आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीबिग बॉस मराठी