Join us

रंजितने लपवली फॅन्सपासून एक गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2016 12:05 IST

मालिका, चित्रपटांमध्ये काम करणारे कलाकार अनेक वेळा आपले खाजगी आयुष्य मीडियापासून दूरच ठेवण्याचा प्रयत्न करतात. काही जण तर त्यांच्या ...

मालिका, चित्रपटांमध्ये काम करणारे कलाकार अनेक वेळा आपले खाजगी आयुष्य मीडियापासून दूरच ठेवण्याचा प्रयत्न करतात. काही जण तर त्यांच्या जोडीदाराबाबतची माहिती मीडियापर्यंत पोहोचू नये याची खबरदारी घेत असतात. एक दुजे के वास्ते या मालिकेतीत रंजित सिंग हा अविवाहित असल्याचे त्याचे फॅन्स समजत आहेत. पण त्याचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले असून त्याने ही गोष्ट मीडियापासून लपवून ठेवलेली आहे. रंजितचे लग्न गुंजन सिन्हाशी झालेले आहे. गुंजन छोट्या पडद्यावरची अभिनेत्री असून तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तिने अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनदेखील केले आहे.