Join us

​OMG! मोहित रैनासोबत फोटोमध्ये दिसणारी 'ती' तरुणी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 12:47 IST

मोहित रैना आणि मौनी रॉय यांचे ब्रेक अप झाले असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. मोहित आणि मौनी ...

मोहित रैना आणि मौनी रॉय यांचे ब्रेक अप झाले असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. मोहित आणि मौनी हे प्रेक्षकांचे आवडते कपल आहे. त्यामुळे त्यांच्या ब्रेक अपची बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. पण त्यांच्या चाहत्यांसाठी आता एक चांगली बातमी आहे. त्यांच्या दोघांमध्ये सगळे काही सुरळीत सुरू असल्याचे म्हटले जात आहे. मोहितने नुकताच इन्स्टाग्रामला एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्याच्यासोबत आपल्याला एक मुलगी पाहायला मिळत आहे. या मुलीचा चेहरा आपल्याला दिसत नसल्याने ही व्यक्ती कोण आहे हे कळत नाहीये. पण ही मुलगी मौनीच असल्याचे त्यांच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. कारण मौनीच्या वाढदिवसाच्या दिवशी याच पोजमधील एक फोटो मौनीने तिच्या इन्स्टाग्रामला शेअर केला होता. या फोटोसोबत मोहितने हार्टचा इमोजी देखील पोस्ट केला आहे. त्यामुळे फोटोत त्याच्यासोबत असणारी व्यक्ती त्याच्यासाठी खूप खास असल्याचे आपल्याला कळत आहे. मोहितने हा पोस्ट केलेला फोटो जुना असल्याने त्या दोघांचे पॅच अप झाले आहे की, मोहित मौनीला मिस करत असल्याने त्याने हा फोटो पोस्ट केला आहे याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मोहित आणि मौनीची ओळख देवों के देव महादेव या मालिकेच्या सेटवर झाली होती. याच मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्या दोघांनी कधीच एकमेकांवरचे प्रेम मीडियात कबूल केले नाही. मोहितने नुकत्याच एक वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, लोकांना जेव्हा एखाद्याची प्रगती आणि त्याचा आनंद पाहावत नाही त्यावेळी लोक अशाप्रकारच्या चर्चा करतात. तसेच त्यांची इमेज खराब करण्याचा प्रयत्न करतात. आज मौनीला जे काही यश मिळाले आहे ते तिच्या इतक्या वर्षांच्या मेहनतीमुळे मिळालेले आहे. तिने आज केलेल्या प्रगतीबद्दल मला तिचा अभिमान आहे. ही तर केवळ एक सुरुवात आहे. मौनीला तिच्या कामावर फोकस करायला देणे आज गरजेचे आहे. Also Read : मौनी रायच्या चाहत्यांसाठी आहे एक वाईट बातमी!