Join us
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला,येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेच्या इतक्या महत्त्वाच्या सीनमध्ये झाली मोठी चूक, प्रचंड होतेय ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 12:09 IST

'येऊ कशी तशी मी नांदायला' यापूर्वीही नेटीझन्सनी मालिकेवर निशाणा साधत खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळाले होते. आता पुन्हा एकदा नेटीझन्सच्या निशाण्यावर ही मालिका आली आहे.

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिका आता निर्णायक वळणावर आली आहे. मालिकेत आता लग्नाची धमाल पाहायला मिळणार आहे. मालिकेत स्वीटू आणि ओम लवकरच लग्नबंधनात अडकणार असा सध्या ट्रॅक पाहायला मिळतोय. मालिकेतल्या आगामाी भागाचे प्रोमोही टीव्हीवर झळकू लागले आहेत. सोशल मीडियावरही हे प्रोमो धुमाकुळ घालत आहेत. मालिकेतले दोन सीन सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. हे व्हि़डीओ पाहून चाहतेही हसून हसून लोटपोट होत असल्याचे पाहायला मिळते आहे. तुम्हीही हा व्हिडीओ नक्कीच पाहिला असणार. 

ओम आणि स्वीटू यांच्या साखरपुड्याच्या सोहळ्याची धूम पाहायला मिळाली. स्वीटूने  साखरपुड्याला लाल रंगाची साडी नेसली होती. साडी बघून मालविका तिला या साडीबद्दल विचारते. तेव्हा स्वीटू हा शालू तिच्या आईच्या म्हणजेच नलूच्या लग्नातील असल्याचं सांगते.तर दुसरा व्हायरल झालेला व्हिडीओ हा नलू मावशीची साडी पाहून मालविक सारखाच प्रश्न विचारते. खूप दिवस कपाटातच होती का? तेव्हा नलू मावशी म्हणते हो हा माझ्या लग्नातला शालू आहे. तुमच्याकडे यायेच होते म्हणून मुद्दामून नेसलीय. दोन्ही व्हिडीओ समोर येताच नेटीझन्सनी व्हिडीओतली चूक पकडली. नेटीझन्सना एकाच मालिकेत होणारी इतकी मोठी चूक झाल्याचे उमगताच प्रचंड खिल्ली उडवायला सुरुवात केली. 

तसेही यापूर्वीही नेटीझन्सनी मालिकेवर निशाणा साधत खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळाले होते. आता पुन्हा एकदा नेटीझन्सच्या निशाण्यावर ही मालिका आली आहे. दोन वेगवेगळे सीन असून यात साडीही नलू आणि स्वीटूने घातलेली सारखीच दाखवायला हवी होती. पण तसे झाले नाही. दोन्ही साड्या या वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे नलू मावशीची लग्नातली साडी जी स्वीटूने साखरपुड्यात घातली त्या दोन्ही वेगवेगळ्या साड्या दाखवण्यात आल्याने सध्या मालिकेचे हे दोन्ही सीन प्रचंड ट्रोल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

मालिकेत यापूर्वी स्वीटू आणि ओम यांच्या लग्नासाठी ओमला नलू मावशीचा होकार मिळवणे गरजेचे होते. नलू मावशीकडून लग्नाला होकार मिळवण्यासाठी ओमला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. नलू मावशीच्या अटीनुसार त्याने अट पूर्ण करत नलू मावशीचा या लग्नासाठी होकार मिळवला. आता लवकरच मालिकेत सनई चौघडे पाहायला मिळणार हे मात्र नक्की.