Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबो..! 'येऊ तशी कशी मी नांदायला'मधील रॉकीच्या पाठीवर झाल्यात मोठ्या जखमा, चाहते चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 20:57 IST

रॉकी उर्फ त्रियुगने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत त्याच्या पाठीवर मोठ्या जखमा पहायला मिळत आहेत. ते पाहून त्याचे चाहते चिंतेत पडले आहेत.

छोट्या पडद्यावरील 'येऊ तशी कशी मी नांदायला'ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे. या मालिकेत रॉकीची भूमिका त्रियुग मंत्रीने साकारली आहे. त्याने याआधी मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. त्रियुग सोशल मीडियावर सक्रीय असून तो फोटो शेअर करत असतो. तसेच तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. त्रियुगने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यात त्याच्या पाठीवर मोठ्या जखमा पहायला मिळत आहेत. ते पाहून त्याचे चाहते चिंतेत पडले आहेत.

त्रियुग मंत्रीने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. ज्यात त्याच्या पाठीवर मोठ्या जखमा पहायला मिळत आहेत.

त्याने याबाबत खुलासा करताना सांगितले की, मी एक उपचार पद्धती करत आहे. यामध्ये रक्त शुद्ध होत असते. या उपचार पद्धतीचे नाव हिजामा असे आहे. 

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेमुळे त्रियुगचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. यापूर्वीही त्याने वेगवेगळ्या मालिकेत काम केले आहे.

'सीआयडी', 'संकटमोचन महाबली हनुमान', 'सम्राट अशोक', 'महाराणा प्रताप', 'विघ्नहर्ता गणेश' या हिंदी मालिकांप्रमाणेच 'पेबॅक, नगरसेवक – एक नायक' सिनेमात तो झळकला आहे.