Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG:कॉमेडी क्वीन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया'नच बलिये'मधून बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2017 16:01 IST

'नच बलिये'म्हणत कॉमेडीयन भारती सिंग तिच्या बॉयफ्रेंड हर्ष लिंबाचियासह छोट्या पडद्यावर थिरकत रसिकांना फुल ऑन एंटरटेन करते.पहिल्यांदाच भारती तिच्या ...

'नच बलिये'म्हणत कॉमेडीयन भारती सिंग तिच्या बॉयफ्रेंड हर्ष लिंबाचियासह छोट्या पडद्यावर थिरकत रसिकांना फुल ऑन एंटरटेन करते.पहिल्यांदाच भारती तिच्या हर्षसह रसिकांच्या समोर आले. या कार्यक्रमामुळे पहिल्यांदाच भारतीची एक नवी कला रसिकांच्या समोर आली. मात्र आता कदाचित ही गोष्ट वाचुन रसिकांचा हिरमोड झाल्याशिवाय राहणार नाही.होय, कॉमेडी क्विन भारती आणि हर्ष 'नच बलिये 8' व्या पर्वातून बाहेर पडले आहेत.'नच बलिये 8' साठी  सॅव्हिओ, डॅनी आणि कुंजन यांनी भारती आणि हर्ष या जोडीला कोरिओग्राफ केले होते.त्यांचा परफॉर्मन्सही रसिकांच्या पसंतीस पडत होता. रसिकांनाही ही जोडी खूप आवडत होती.  रसिकांना या दोघांना आणखी चांगल्या चांगल्या गाण्यांवर थिरकताना पाहायचे होते मात्र आता रसिकांच्या स्वप्नांवर पूर्ण पाणी फिरले आहे. या शोमध्ये दिव्यांका त्रिपाठी-विवेक दहिया, सनाया इराणी-मोहित सेहगल, दीपिका काकर-शोएब इब्राहीम अशा एकापेक्षा एक ग्लॅमरस जोड्या एक से बढकर एक परफॉर्मन्स देत रसिकांची वाह वा मिळवत आहेत.त्यात आता काही दिवसांपूर्वीच सिध्दार्थ जाधव आणि तृप्ती जाधव ही जोडी रसिकांचे मत कमी मिळाल्यामुळे बाहेर पडली होती. आता पुन्हा वाईल्ड कार्ड एंट्रीच्या माध्यमातून ही जोडी शोमध्ये एंट्री करणार आहेत. त्यामुळे  दिवसेंदिवस हा सामना आणखीनच कठिण होत जाणार आहे.तर दुसरीकडे सिद्धार्थची लोकप्रियता पाहाता सिद्धार्थ आणि तृप्ती नच बलियेच्या किताबावर कब्जा करतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.त्यामुळे सगळ्या आव्हानांवर मात करत कोणती जोडी 'नच बलिये 8'चा विजेतेपद पटकावणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.