Join us

OMG! ​कश्मिरा शहाने केले हॉट फोटो शूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 11:58 IST

अभिनेत्रींनी बोल्ड फोटोशूट करणे यात काही नवीन नाही. अभिनेत्री आपले बोल्ड फोटो सोशल नेटवर्किंगला पोस्ट करत असतात. आता कश्मिरा ...

अभिनेत्रींनी बोल्ड फोटोशूट करणे यात काही नवीन नाही. अभिनेत्री आपले बोल्ड फोटो सोशल नेटवर्किंगला पोस्ट करत असतात. आता कश्मिरा शहाने तिचे फोटो सोशल नेटवर्किंगला पोस्ट केले आहेत.कश्मिरा शहा ही छोट्या पडद्यावरची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्याचसोबत तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. बिग बॉस या चित्रपटात ती शाहरुख खान, जुही चावला, आदित्य पांचोली यांच्यासोबत झळकली होती. तिने बिग बॉस या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनमध्येदेखील तिने हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील तिची उपस्थिती चांगलीच चर्चेचा विषय बनली होती. कारण बिग बॉसमध्ये ती बिकनीमध्येदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. आता तिचे हेच बिकनी रूप इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगवर पाहायला मिळाले आहे. तिने नुकतेच तिचे बिकनी पिक्चर इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत. ब्लॅक रंगाच्या बिकनीमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे. तसेच तिने पिंक रंगाचा गॉगलदेखील या फोटोत घातला आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. तिच्या या फोटोंना कित्येक लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. तसेच अनेकांनी हे तिचे फोटो शेअरदेखील केले आहेत. कश्मिरा ही तिच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत आहे. ती गेल्या अनेक वर्षांपासून कृष्णासोबत लिव्ह इन मध्ये राहात आहे. कृष्णा आणि कश्मिराच्या नात्याला सुरुवातीला कृष्णाच्या घरातून विरोध करण्यात आला होता. कश्मिरा ही कृष्णापेक्षा वयाने मोठी असून तिचा घस्टफोट झालेला होता. पण नंतर या दोघांच्या नात्याला त्याच्या घरातल्यांनी संमती दिली.