Join us

OMG! ​बिग बॉस फेम मोना लिसाच्या बिकिनी फोटोने सोशल मीडियावर उडवली धूम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2017 15:55 IST

मोना लिसा आणि विक्रांत बिग बॉसच्या घरात झळकले होते. त्यावेळी त्यांच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा झाली होती. मोना लिसाने अनेक ...

मोना लिसा आणि विक्रांत बिग बॉसच्या घरात झळकले होते. त्यावेळी त्यांच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा झाली होती. मोना लिसाने अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच ती काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील झळकली आहे. मोना लिसा ही मुळची कोलकाताची असून तिने ओरिसा भाषेतील म्युझिक व्हिडिओमधून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ब्लॅकमेल या हिंदी चित्रपटातही ती झळकली होती. पण तिला खरी प्रसिद्धी ही बिग बॉसने मिळवून दिली. तिने बिग बॉसच्या घरातच तिचा प्रियकर विक्रांत सिंग सोबत लग्न केले. या लग्नाची त्यावेळी चांगलीच चर्चा झाली होती. विक्रांत आणि मोना लिसा हे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही आपापल्या कामात व्यग्र होते. बिग बॉसनंतर ते दोघे नच बलिये या कार्यक्रमात झळकले होते. नच बलियेच्या चित्रीकरणासाठी आणि डान्स प्रॅक्टिससाठी त्या दोघांना खूप वेळ द्यावा लागत असे. त्यामुळे त्यांना एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळत नव्हता. पण आता ते आपल्या व्यग्र शेड्युलमधून वेळ काढून मलेशियाला गेले आहेत. मलेशियात ते दोघे एकमेकांसोबत खूपच चांगला वेळ घालवत आहेत. या ट्रीपमध्ये मोना लिसाचा बोल्ड अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मोना लिसाने तिच्या सोशल नेटवर्किंग साईटवर तिचे काही बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत स्विमिंग पूलच्या बाजूला बिकनी घालून बसलेली मोना लिसा दिसत आहे. नच बलिये या कार्यक्रमानंतर मोनाचे वजन चांगलेच कमी झालेले आहे. त्यामुळे आपल्याला या फोटोत सडपातळ मोना लिसा पाहायला मिळत आहे. Also Read : OMG : ​‘चंद्र नंदिनी’ची ही अ‍ॅक्ट्रेस रियल लाइफमध्ये आहे बिकिनी क्वीन !