Join us
Daily Top 2Weekly Top 5

​OMG! अर्शी खान परतणार बिग बॉसमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 16:12 IST

बिग बॉस या कार्यक्रमाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. विकास ...

बिग बॉस या कार्यक्रमाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. विकास गुप्ता, हिना खान, शिल्पा शिंदे, आकाश ददलानी, पुनित शर्मा हे पाचच स्पर्धक सध्या बिग बॉसच्या घरात असून यांच्यामधून कोण विजेता ठरेल याबाबत प्रत्येक जण आपली मतं नोंदवत आहेत. या कार्यक्रमातून बाहेर पडलेले स्पर्धक घरात कोणत्या ना कोणत्या कारणांनी परत जात असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. नुकतीच बंदगी कार्लाने बिग बॉसच्या घरात एंट्री केली होती. घर आये घरवाले या टास्कच्या अंतर्गत ती घरात आली होती. त्यानंतर कार्यक्रमात खूप सारे ट्वीस्ट पाहायला मिळाले. आता यानंतर बिग बॉसमधून बाहेर पडलेली आणखी एक स्पर्धक प्रेक्षकांना बिग बॉसच्या घरात पाहायला मिळणार आहे.अर्शी खान ही बिग बॉसच्या घरात येण्याआधीच कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन म्हणून ओळखली जात होती. या कार्यक्रमात देखील तिने अनेक वाद निर्माण केले. यामुळे ती या कार्यक्रमाच्या विजेतेपादाची प्रबळ दावेदार मानली जात होती. पण काही दिवसांपूर्वी ती कार्यक्रमातून बाहेर पडली. पण आता ती या कार्यक्रमात पुन्हा परतणार असल्याची जोरदार चर्चा आहे. अर्शी खान बिग बॉसच्या घरात लवकरच दाखल होणार असून ती मुंबईतून लोणावळ्याला रवाना देखील झाली असल्याचे म्हटले जात आहे. अर्शी खान परत येणार असे ऐकल्यावर तिच्या फॅन्सना नक्कीच आनंद झाला असेल. पण अर्शी खान या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून नव्हे तर एक पाहुणी म्हणून दिसणार आहे. बिग बॉसच्या घरात पाहुणी म्हणून ती दाखल होणार आहे. पण ती घरात जाऊन काय करणार याबाबत अद्याप तिने मौन बाळणेच पसंत केले आहे. बिग बॉसचे फायनल आता जवळ आल्यामुळे प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी घरात काय ड्रामा घडतो याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे आणि त्यात अर्शी घरात पाहुणी म्हणून जाणार असल्याने घराचे वातावरण तंग होणार यात काहीच शंका नाही. Also Read : सलमान खानला घरी भेटण्यासाठी गेलेल्या अर्शी खानला गार्ड्सनी हाकलले, व्हिडीओ व्हायरल!