Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG_ आमिर खानने 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर गायले अप्सरा आली हे गाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2017 14:54 IST

मराठी भाषेचे आमिरला चांगले ज्ञान आहे. त्याला मराठी भाषा उत्तम बोलता येत नसली तरी तो मराठी सिनेमांचा चाहता आहे.नुकतेच ...

मराठी भाषेचे आमिरला चांगले ज्ञान आहे. त्याला मराठी भाषा उत्तम बोलता येत नसली तरी तो मराठी सिनेमांचा चाहता आहे.नुकतेच त्याने चला हवा येऊ द्या या शोमध्ये पाणी फाऊंडेशनच्या उपक्रमाची माहिती महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचावी यासाठी या मंचावर तो मराठमोळ्या अंदाज दिसला. यावेळी त्याने ब-यापैकी मराठीतूनच संवाद सांधण्याचा प्रयत्न केला. आमिर खानचे मित्रमंडळी मराठीच असल्यामुळे त्याला मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या सगळ्या घडामोडींची माहिती मिळत असते. तसेच आमिर खानने 'नटरंग', 'फँड्री' आणि 'सैराट' हे मराठी सिनेमा पाहिले असून मराठी सिनेमाचे कौतुकही केले.आमिरने 'अप्सरा आली हे'..... गाणे खूप आवडत असल्याचे सांगताच चाहत्यांनीही त्याला हे गाणे ऐकण्याची इच्छा व्यक्त केली.चाहत्यांना नाराज कसे करणार म्हणून खुद्द आमिरने अप्सरा आली हे गाणे गात सा-यांनाच मंत्रमुग्ध केल्याचे पाहायला मिळाले.तसेच या मंचावर कॉमेडी स्कीट सादर होत असताना अभिनेत्री श्रृती बुगडेसह 'थ्री इडियट' सिनेमातले ''जुबी डुबी  ......जुबी डुबी'' आणि 'रंग दे बसंती' सिनेमातील 'अपनी तो पाठशाला'.....  या गाण्यावर ठेकाही धरल्याचे पाहायला मिळाले.मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खान जे काही करतो ते पर्फेक्ट असतं.मग ते एखादा सिनेमा असो किंवा त्या सिनेमातील भूमिका. त्या भूमिकेतलं परफेक्शन असो किंवा ते परफेक्शन येण्यासाठी करावी लागणारी मेहनत,प्रत्येक गोष्टीत आमिर तितकाच जीव ओतून काम करतो.म्हणून मराठी भाषा जोपर्यंत परफेक्ट बोलता येत नाही तोपर्यत मराठी सिनेमात काम करणार नाही असेही आमिरने सांगितले. तसेच आगामी काळात मराठी सिनेमा प्रोड्युस करणार असल्याची गोड बातमीही त्याने यावेळी रसिकांना दिली.