Join us

...अन् मयुरी देशमुखने ओमप्रकाशच्या कानाखाली लगावली; 'खुलता कळी खुलेना' मालिकेच्या सेटवर काय घडलं होतं?

By कोमल खांबे | Updated: July 2, 2025 16:11 IST

मालिकेच्या शूटिंगदरम्यान मयुरीने एकदा ओमप्रकाशच्या कानाखाली लगावली होती. नेमकं काय झालं होतं? जाणून घेऊया. 

झी मराठी वाहिनीवरील अनेक गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे 'खुलता कळी खुलेना'. या मालिकेचं शीर्षक गीतही प्रचंड लोकप्रिय ठरलं होतं. मयुरी देशमुख, ओमप्रकाश शिंदे आणि अभिज्ञा भावे अशी या सिनेमाची स्टारकास्ट होती. या मालिकेतील मयुरी आणि ओमप्रकाशची जोडी प्रेक्षकांना आवडली होती. पण, मालिकेच्या शूटिंगदरम्यान मयुरीने एकदा ओमप्रकाशच्या कानाखाली लगावली होती. नेमकं काय झालं होतं? जाणून घेऊया. 

मयुरी देशमुख, ओमप्रकाश शिंदे आणि अभिज्ञाने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत ओमप्रकाशने हा किस्सा सांगितला. "आम्ही मेकअपरुममध्ये डान्सची प्रक्टिस करत होतो. आम्ही नवीन होतो आणि एकमेकांना फार ओळखत नव्हतो. आम्ही रोमँटिक गाण्याची प्रॅक्टिस करत होतो. मयुरी पुढे आणि मी तिच्या पाठीमागे...हातात हात घेऊन मला तिला उचलायचं होतं. तिच्या खांद्यावर माझी मान होती. आणि माझा कान तिच्या कानाला लागला. तर तिला असं वाटलं की मी तिला किस करतोय. तिने खाडकन माझ्या कानाखाली लगावली", असं ओमप्रकाश म्हणाला. 

त्यावर स्पष्टीकरण देत नंतर मयुरी म्हणाली, "माझं असं होतं की मी सुरुवातीला नमस्कार करते. मी हाय हॅलोदेखील लवकर करत नाही. मिठी तर फार दुरची गोष्ट. आणि आम्ही गाण्याची प्रक्टिस करत होतो. त्याचा कान मला लागल्यामुळे मला असं वाटलं की हा खूप मॉर्डन आहे का...त्यामुळे मी त्याच्या कानाखाली मारली". "त्यामुळे नंतर मग मयुरीशी मैत्री व्हायला जास्त वेळ लागला", असं ओमप्रकाशने सांगितलं. 

टॅग्स :मयुरी देशमुखओमप्रकाश शिंदेटिव्ही कलाकार