अरेच्चा! हे किकू शारदाचे मत आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 12:59 IST
द कपिल शर्मा' शो मध्ये विविध भूमिका साकारत काॅमेडी करत असल्याचे किकू शारदाला आपण पाहिलंय. गेल्या वर्षी किकू शरादाने ...
अरेच्चा! हे किकू शारदाचे मत आहे?
द कपिल शर्मा' शो मध्ये विविध भूमिका साकारत काॅमेडी करत असल्याचे किकू शारदाला आपण पाहिलंय. गेल्या वर्षी किकू शरादाने केलेल्कॅाया वादग्रस्त कॅामेडीमुळेच तो वादाच्या भोव-यातही अडकला होता. त्यावेळी त्याला जेलही होण्याची शक्यता होती. मात्र काही दिवसांनंतर या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला.किकू शारदाने केलेल्या काॅमेडीवरून त्याला जाहिर माफीही मागावी लागली होती. मात्र आता किकू शारदाचे काॅमेडीवर काही वेगळेच मत आहे. किकू शारदा लवकरच एका सिनेमात झळकणार आहे.या सिनेमाच्या निमित्ताने कॉमेडीविषयी त्याचे मत विचारण्यात आल्यानंतर त्याने त्याचे रोखठोक मत मांडले. माझ्या कार्यक्रमातून मी नेहमीच सहज सोपी कॉमेडी करत आलोय. खालच्या दर्जाची कॅामेडी करणे मला आवडत नाही.त्यातही कोणा एका व्यक्तिचा काॅमेडीतून अपमान होणार नाही यवर मी नेहमी देतो.अश्लील शब्द वापरून केली जाणारी कॉमेडी मला करता येत नाही. मुळात ते माझ्या बुध्दीलाही पटत नसल्याचे आगळे-वेगळे मत त्याने व्यक्त केले आहे. मला सहज अभिनय करता येत नाही, त्यासाठी या अशा खालच्या दर्जाची कॉमेडी कधीही करणार नसल्याचेही त्याने म्हटले आहे.