Join us

आता, 'ती फुलराणी' ही रूपरी पडदयावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 11:12 IST

कटयार काळजात घुसली, नटसम्राट या दोन यशस्वी नाटकांनंतर आता,' ती फुलराणी' हे लोकिप्रय नाटक देखील रूपेरी पदडयावर सादर होणार ...

कटयार काळजात घुसली, नटसम्राट या दोन यशस्वी नाटकांनंतर आता,' ती फुलराणी' हे लोकिप्रय नाटक देखील रूपेरी पदडयावर सादर होणार आहे.या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे हा प्रा.जहागीरदार भूमिकेत तर अभिनेत्री राजश्री लांडगे मंजुळाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे शिवधनुष्य अमोल शेटगे यांनी उचलले आहे. कटयार काळजात घुसली या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य करणारा अभिनेता सुबोध भावे या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. तसेच मराठीतील लोकप्रिय नाटकांवर आधारित चित्रपट तयार करण्याचा हा कल आता 'ती फुलराणीच्या' निमित्ताने पुढे ही सुरू राहणार असल्याचे दिसते. कटयार काळजात घुसली, नटसम्राट या चित्रपटांचे यश पाहता' ती फुलराणी' हा ही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल हे नक्की.