आता बहिणीच्या नव्हे आईच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2016 11:51 IST
संजय लीला भन्सालीच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटात अनुजा साठेने बाजीरावांच्या बहिणीची म्हणजेच भिऊबाईची भूमिका साकारली होती. बाजीरावांच्या आयुष्यावर एक ...
आता बहिणीच्या नव्हे आईच्या भूमिकेत
संजय लीला भन्सालीच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटात अनुजा साठेने बाजीरावांच्या बहिणीची म्हणजेच भिऊबाईची भूमिका साकारली होती. बाजीरावांच्या आयुष्यावर एक मालिका लवकरच सुरू होणार असून याही मालिकेत अनुजा आहे. पण या मालिकेत अनुजा बाजीरावांच्या बहिणाच्या नव्हे तर आईच्या म्हणजेच राधाबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. अनुजाने तमन्ना या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेने काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता बाजीराव मस्तानी या मालिकेद्वारे अनुजा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे. भिऊबाई या भूमिकेपेक्षा राधाबाई ही भूमिका अधिक सशक्त असल्याने या भूमिकेसाठी तिला अधिक मेहनत घ्यावी लागत अाहे असे ती सांगते.